Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Makar Sankranti Gifts: मकर संक्रांतीसाठी अगदी स्वस्तात खरेदी करा 'हे' वाण

Makar Sankranti Gifts

Makar Sankranti: मकर संक्रांत जवळ आली की, प्रत्येक महिलेला प्रश्न पडतो की, यंदा हळदी-कुंकूला वाण म्हणून काय द्यायचे? तुमच्या याच प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी, आम्ही घेऊन आलो आहोत. तुमच्यासाठी खास सर्वात स्वस्तात व अत्यंत उपयोगी पडतील असे जबरदस्त वाण. त्यामुळे तुमची ही संक्रांत वाणची चिंता नक्कीच मिटेल.

Makar Sankranti: नवीन वर्षाची सुरूवात झाली की, येणारा पहिला सण असतो तो म्हणजे मकर संक्रांत. 14 जानेवारीला असणाऱ्या या सणाची तयारी चार ते पाच दिवसांपासून आधीच करावी लागते. कारण जास्तीत- जास्त महिला हळदी-कुंकूला बोलावयचे म्हणजे इतक्या साऱ्या महिलांना वाण म्हणून काय द्यायचे, हा प्रश्न प्रत्येक महिलेला पडलेला असतो. महिलांची ही समस्या सोडविण्यासाठी, आम्ही घेऊन आलो आहोत, मकर संक्रांतनिमित्त अगदी कमी बजेटमध्ये सर्वोत्तम असे उपयोग पडणारे टाॅप 5 वाण.  

गूळ व शेंगदाणे (Jaggery and Peanuts)

महिलांच्या आरोग्याचा प्रश्न समोर ठेवून गुड व शेंगदाण्यांची निवड ही वाण म्हणून करणे. कारण महिलांमध्ये मोठया प्रमाणात हिमोग्लोबीनची कमी जाणविते. त्यामुळे गुड व शेंगदाणे मिक्स करून, ते 250 ग्रॅम स्वरूपात देणे कधीही उत्तम ठरेल.

Peanut
http://www.jiomart.com/

विम बार साबण (Vim bar Soap)

विम बार साबण हा भांडी घासण्यासाठी वापरला जातो. फक्त 10 रूपयात हा साबण येत असल्याने, हे वाण म्हणून महिलांना देणे अत्यंत फायदेशीर ठरेल. प्लॅस्टिकच्या काही वस्तू देण्याएवजी हा साबण देणे कधी ही उत्तम ठरेल. स्वस्त व मस्त असे अत्यंत उपयोगी वाण.

Vimbar soap
http://www.indiamart.com/

मॅगीचे पॅकेट (Maggi Packet) 

घरातील लहानांपासून ते मोठयांपर्यंत प्रत्येकाला आवडणारा पदार्थ म्हणजे मॅगी. त्यामुळे मॅगीला कुणी नाकारेल हे होऊच शकत नाही. फक्त 10 ते 12 रूपयांत अत्यंत स्वादिष्ट व सर्वांना आवडणारी मॅगी आपण मकर संक्रातीला वाण म्हणून नक्कीच देवू शकतो.

Maggie
http://time.com/

नॅपकीन व रूमाल (Napkin and Handkerchief)

सध्या बऱ्याच आॅनलाइन शाॅपिंग पोर्टल व अॅपवर मोठया प्रमाणात सेल सुरू आहेत. त्यामुळे तुम्हाला पाहिजे त्या वस्तू कमी खर्चात किंवा आॅफरमध्ये मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही त्यातल्या त्यात नॅपकीन किंवा रूमालचा सेट वाण म्हणून देवू शकता.

Napkin
http://www.amazon.in/

डोक्याचे रबर (Head Rubber)

सध्या रंगबेरंगी रबरची फॅशन निघाली आहे. प्रत्येक मुलींचे केस हे रंगबेरंगी अशा आकर्षक रबरने बांधलेले असल्याचे पाहायला मिळत आहेत. तसेच हेच रबर स्टाइल म्हणून त्यांच्या हातात ब्रेसलेट म्हणूनदेखील दिसतात. हे रबर अगदी पंधरा ते वीस रूपयांत असतात. त्यामुळे तुम्ही सहज हे रबर वाण म्हणून महिलांना देणे कधी ही मस्त पर्याय राहीन. 

Colorful rubber band
http://www.shopsy.in/