Mahindra Plans To Expand Production Capacity : ऑटोमेकर महिंद्रा अँड महिंद्रा (M&M)ने सांगितले की, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये लाईट कमर्शियल व्हेईकल (LCV) सेगमेंटसाठी उद्योग 7-8 % दराने वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र या गोष्टी पूर्ण करण्यास Macroeconomic Factors व्यतिरिक्त दुसऱ्या इतर कुठल्याही अडचणी नाही. तसेच Semiconductor Chip ची कमतरता देखील या श्रेणीच्या उत्पन्नावर कोणताही प्रभाव टाकू शकली नाही.
मासिक उत्पादन क्षमता किती?
महिंद्रा अँड महिंद्राचे व्हीपी आणि नॅशनल सेल्स हेड बनेश्वर बॅनर्जी म्हणाले की, 2-3.5 टन श्रेणीतील LCV साठी आमची सध्याची मासिक उत्पादन क्षमता 17,500 युनिट्स आहे. त्यापैकी सीएनजीच्या गाड्या 1000 ते 1500 व्हॉल्यूम आहे.
काय आहे सुविधा?
महिंद्राने बोलेरो पिकअप्स (Bolero pick-ups) मध्ये 3 लीटर m2Di इंजिन दिले आहे, जे 65 bhp पॉवर आणि 195 nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. महिंद्राच्या या लहान आकाराच्या पिकअप वाहनाची एक्स-शोरूम किंमत 7.68 लाख रुपये आहे. कंपनी या वाहनावर उत्तम फायनान्स पर्याय देखील उपलब्ध करुन देत आहे, ज्या अंतर्गत ग्राहक फक्त 25,000 रुपयांचे डाउन पेमेंट करून ही गाडी विकत घेऊ शकतो. महिंद्राचे हे बोलेरो मॅक्सएक्स पिकअप त्याच्या विभागातील सर्वाधिक विक्री होणारे वाहन आहे. त्यामुळे कंपनी आता या वाहनाची उत्पादन क्षमता आणि विक्रि क्षमता वाढविण्यावर भर देत आहे.
काय आहे वैशिष्ट्य?
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, कंपनीने नवीन प्लॅटफॉर्म MAXX वर तयार केलेले पहिले उत्पादन बोलेरो मॅक्सएक्स पिक-अप, उत्तम कामगिरी आणि टेलिमॅटिक्स सोल्यूशन्ससह मार्केटमध्ये आणले. महिंद्रा या मिनी पिकअपसाठी 20,000 किलोमीटरच्या सर्व्हिस इंटरव्हलसह 3 वर्षे किंवा 1,00,000 किमी, यापैकी जे आधी असेल त्याची वॉरंटी देखील देत आहे. नवीन सर्व-नवीन बोलेरो मॅक्सएक्स पिक-अप वर्धित इंजिन आणि पॉवरसह अनेक फर्स्ट-इन-सेगमेंट वैशिष्ट्यांसह आहे. जसे की उंची समायोजित (Adjust) करण्यायोग्य सीट, प्रगत iMAXX तंत्रज्ञान, वर्ग-अग्रणी पेलोड क्षमता आणि टर्न सेफ लाईट्स यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.