Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mahindra's Canada Biz Wind Up: आनंद महिंद्रांनी कॅनडातील कंपनी केली बंद, शेअर्समध्ये मोठी घसरण

mahindra

Image Source : http://www.twitter.com/

Mahindra's Canada Biz Wind Up: महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी गुरुवारी आपल्या कॅनडातील कंपनीचे कामकाज गुंडाळण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण झाली.

महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी गुरुवारी कॅनडातील कंपनीचे कामकाज बंद केले. महिंद्रा समूहाने सांगितले की कॅनडास्थित कंपनी 'रेसन एरोस्पेस कॉर्पोरेशन'ने कामकाज बंद केले आहे. महिंद्रा अँड महिंद्राकडे कंपनीत 11.18% हिस्सा असून दिवाळखोरीमुळे कंपनीने ऐच्छिकपणे व्यवसाय बंद करण्याचा अर्ज केला होता. या निर्णयानंतर महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. आज शेवटच्या तासात महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर 3% घसरणीसह 1584 रुपयांवर ट्रेड करत होता. 

महिंद्रा अँड महिंद्राचे निवेदन    

महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) ने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, 20 सप्टेंबर 2023 रोजी कॉर्पोरेशन कॅनडाकडून ऑपरेशन्स बंद करण्याच्या मंजुरीसाठी रेसनला आवश्यक कागदपत्रे मिळाली होती, ज्याची माहिती कंपनीला देण्यात आली होती. यानंतर रेसनने आपले कामकाज बंद केल्याचे कंपनीने म्हटले आहे.

शेअर्समध्ये घसरण 

या बातमीनंतर महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. बाजार बंद होण्याच्या 10 मिनिटे आधी महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स 3% घसरणीसह 1584 रुपयांवर व्यवहार करत होते. तथापि, ट्रेडिंग सत्रादरम्यान, कंपनीचे शेअर्स साडेतीन टक्क्यांनी घसरले आणि दिवसाच्या शेवटी 1575.75 रुपयांपर्यंत खाली पोहोचले.

महिंद्रा अँड महिंद्राचे मोठे नुकसान

दुसरीकडे, कंपनीच्या शेअर्सच्या घसरणीमुळे कंपनीच्या valuation  मध्ये  7200 कोटी रुपयांहून अधिक घसरण झाली आहे. आकडेवारीनुसार, या घटनेच्या एका दिवसापूर्वी कंपनीचा हिस्सा 1634.05 रुपये इतका होता आणि कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन (भांडवल )  2,03,025.78 कोटी रुपये होते. आज जेव्हा कंपनीचे शेअर्स 1575.75 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत तेव्हा कंपनीचे मार्केट कॅप 1,95,782.18 कोटी रुपये झाले. अशा परिस्थितीत कंपनीच्या मुल्यांकनाला 7,243.6 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे