Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Maharojgar Melava : मुंबईत शनिवारी महारोजगार मेळाव्याचे आयोजन, हजारो नोकरीच्या संधी

Pandit Dindayal Upadhyay Job Fair

Image Source : www.india.com

Pandit Dindayal Upadhyay Job Fair : या मेळाव्यात मुंबई शहर येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. यासोबतच उद्योजकता मार्गदर्शन आणि करिअर समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार 3 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 वा. पासून एलफिन्स्टन टेक्निकल हायस्कूल, 3 महापालिका मार्ग, धोबी तलाव,  फोर्ट, मुंबई या ठिकाणी हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 

या मेळाव्यात मुंबई शहर येथील कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. यासोबतच उद्योजकता मार्गदर्शन आणि करिअर समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते होणार असून यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन., मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्यासह विविध उद्योजक उपस्थित राहणार आहेत.

विविध क्षेत्रातील 7 हजार पदे भरणार (7 thousand posts will be filled from various fields)

मेळाव्यात बी.व्ही.जी. इंडिया लि., आयसीजे, स्पॉटलाईट, स्मार्ट स्टार्ट, बझ वोर्क, टीएनएस इंटरप्रायझेस, युवाशक्ती, इम्पेरेटिव्ह इत्यादी उद्योग सहभागी होणार आहेत. या मेळाव्यात बँकिंग, आयटीआयएस, टुरिझम, हॉस्पिटॅलिटी, एचआर अॅप्रेंटीसशिप, डोमेस्टिक वर्कर, इलेक्ट्रॉनिक्स, मॅनेजमेंट तसेच मीडिया अॅण्ड एन्टरटेंमेंट अशा विविध क्षेत्रात एकूण 7 हजार पदे भरली जाणार आहेत.

अप्रेंटीसशिपचीही संधी (Apprenticeship opportunity)

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून एक किंवा दोन वर्षाचा तांत्रिक अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी नामांकित कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत अप्रेंटीसशिपची पदेही या मेळाव्यात उपलब्ध असणार आहेत. या मेळाव्यात स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देणारी विविध शासकीय महामंडळे सहभागी होणार आहेत. यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांच्या योजनांची माहिती पुरविणारे स्टॉल लावण्यात येणार आहेत. याचबरोबर विविध शासकीय व खासगी क्षेत्रातील बँकांचाही समावेश असणार आहे.