Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Maharashtra Tops in Startups Across The Country: देशभरात स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्र अव्वल, तर पुण्यात सर्वाधिक नवउदयोग

Maharashtra Tops in Startups

Startups: भारतात नुकताच 'स्टार्ट अप डे' साजरा करण्यात आला आहे. या खास दिवसानिमित्त 'पीडब्ल्यूसी' (PWC) या जागतिक कंपनीकडून एक अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये देशात सर्वाधिक स्टार्ट अपमध्ये महाराष्ट्र (Maharashtra)अव्वल आहे, तर पुण्यात (Pune) सर्वाधिक स्टार्ट अप सुरू झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेवुयात.

Maharashtra Tops in Startups Across The Country: स्टार्ट अप डे निमित्त पीडब्ल्यूसी या जागतिक कंपनीकडून एक अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालात सांगण्यात आले आहे की, बंगळूर, दिल्ली, चेन्नई यांसारख्या राज्यांना मागे टाकत सर्वाधिक स्टार्ट अपचे प्रमाण महाराष्ट्रात असून पुणे या शहरात सर्वाधिक स्टार्ट अप सुरू करण्यात आले आहेत. याविषयी अधिक जाणून घेवुयात.

स्टार्ट अप गुंतवणूक 

पीडब्ल्यूसी या जागतिक कंपनीच्या अहवलानुसार, बेंगळुरू येथील स्टार्ट अपमध्ये 113.34 कोटी डॉलरची गुंतवणूक करण्यात आली. मुंबई येथे 33.32 कोटी डॉलर तर दिल्ली येथे  51.74 कोटी डॉलरची गुंतवणूक झाली. 2021 च्या तुलनेत बेंगळुरू, दिल्ली आणि मुंबई या तिन्ही शहरांधील गुंतवणुकीत जवळपास 35 ते 40 कोटी डॉलरची घट झाली असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, पुणे आणि चेन्नईत या शहरात गुंतवणुकीत मोठी वाढ होत आहे. 2021 मध्ये पुण्यातील स्टार्टअपमध्ये 10.92 कोटी डॉलरची गुंतवणूक झाली. तर मागील वर्षातील गुंतवणुकीत वाढ होऊन, ती आज 13.65 कोटी डॉलरवर पोहोचली आहे.

राज्यात किती स्टार्टअप

देशातील एकूण 72702 मान्यता असलेले स्टार्टअप्स असून त्यापैकी एकूण 13450 स्टार्टअप्स महाराष्ट्रात राज्यात आहेत. देशभरात 2021-22 मध्ये सुरु झालेल्या 44 स्टार्टअप्स यूनिकॉर्नपैकी 11 यूनिकॉर्न्स महाराष्ट्र  राज्यात आहेत. यूनिकॉर्न म्हणजे अशी कंपनी ज्या कंपनीचे मूल्यांकन 7 हजार 500 कोटी ते 75 हजार कोटी रुपये आहे.

पुणे अव्वल

अहवालानुसार काही तंज्ञाचे असे म्हणणे आहे की, महाराष्ट्रात सर्वाधिक स्टार्ट अप पुणे या शहरात सुरू करण्यात आले आहेत.  नव-नवीन उदयोजकांच्या दृष्टीने पुणे हे शहर नावारूपास येत आहे. आगामी काळात पुण्यात ऑटोमोबाइल्स, फिनटेक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक यासंबंधित अनेक स्टार्टअप सुरू करण्यात येतील. इलेक्ट्रॉनिक व्हेइकलमध्येही पुण्यात चांगली गुंतवणूक होणार असल्याचे दिसत आहे. तसेच भविष्यात पुण्यात स्टार्टअपमध्ये मोठी गुंतवणूक होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.