दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव व सायकल, श्रवणयंत्रे, चष्मा यासारखी साधने पुरवण्यासाठी राज्य सरकारने योजना सुरु केली आहे. (Maharashtra govt disability scheme) राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे ही योजना चालवण्यात येते. गरजू दिव्यांगांना त्यांच्या वैयक्तिक गरजेनुसार आवश्यक ती साधने देणे. तसेच त्यांच्या वयोगटानुसार किंवा आवश्यकतेनुसार ती बदलता यावी त्यासाठी कृत्रिम अवयव, तीन चाकी सायकल पुरविण्याची ही योजना आहे.
योजना कोणत्या प्रवर्गासाठी लागू आहे
अंध, अंशत:अंध, अस्थिव्यंग, कर्णबधिर व्यक्तींसाठी ही योजना लागू आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यात अर्ज सादर करावा लागेल. लाभार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न दरमहा रु 1 हजार 500 पेक्षा कमी असावे. 1 हजार 501रुपये ते 2 हजार रुपयापर्यंत उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना मिळणाऱ्या साधनाची अर्धी रक्कम भरावी लागेल. अर्जदाराचे अपंग किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावे, ही अट आहे.
योजनेअंतर्गत दिली जाणारी साधणे
या योजनेत अस्थिव्यंग दिव्यांगासाठी कृत्रिम साधने (कॅलिपर्स, बूट, पाठीचे जॅकेट) कृत्रिम अवयव, तीन चाकी सायकली, मूकबधिरांना श्रवण यंत्रे, अंधांना चष्मे, पांढरी काठी इत्यादी 3 हजार रुपयापर्यंतचे साहित्य देण्याची योजना आहे.
योजनेचा अर्ज कसा सादर करावा
विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर यांच्याकडे सादर करता येईल.
राज्य सरकारद्वारे व्यवसायिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या दिव्यांगांसाठी त्यांचा स्वत: व्यवसाय सुरू करण्यासाठी वित्तीय सहाय्य देण्याची योजनाही सुरू आहे. या योजनेत दिव्यांग व्यक्तींना उद्योगांबाबत 1000 रुपये साधन सामुग्रीच्या स्वरुपात आर्थिक मदत दिली जाते. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतंत्रपणे अर्ज करावा लागतो.