Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Decision to rehabilitate chawls: एनटीसी गिरण्यांच्या जमिनीवरील चाळींचे पुनर्वसन करण्याचा निर्णय

Rehabilitation of NTC Chawl

Rehabilitation of NTC Chawl: एनटीसीच्या सर्व मोडकळीस आलेल्या चाळींमधील सुमारे 2062 रहिवाशांचे महाराष्ट्र सरकारच्या समन्वयानं जलद पुनर्वसन करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. याबाबतचे सर्व तपशील पुढे बातमीत वाचा.

Maharashtra government will rehabilitate NTC Chawl: केंद्रीय वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी नुकतेच एमएमआरडीए अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत, एनटीसी गिरण्यांच्या जागेवरील चाळींच्या पुनर्विकासाबाबत आढावा बैठक घेतली. एनटीसीच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता वर्मा यांनी एनटीसीच्या गिरण्यांची अवस्था आणि गिरण्यांच्या जमिनीवरील चाळींमधील रहिवाशांच्या पुनर्वसनाच्या गंभीर समस्येबाबत शासनाला माहिती दिली. यामुळे येथील चाळींचे लवकारत लवकर पुनर्वसन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे, पियुष गोयल यांनी माध्यमांना सांगितले.

एनटीसीची स्थापना 1968 मध्ये, 1974, 1985 आणि 1995 च्या राष्ट्रीयीकरण कायद्याद्वारे, आजारी कापड गिरण्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी झाली होती. सध्या एनटीसीकडे  सुमारे 10 हजार कर्मचाऱ्यांसह, 23 कार्यरत गिरण्या, 49 बंद गिरण्या (आयडी कायद्यांतर्गत), 16 जे. व्ही गिरण्या आणि 2 बंद गिरण्या आहेत. मुंबई शहरात 13.84 एकर क्षेत्रफळात व्यापलेल्या, एनटीसी गिरण्यांच्या एकूण 11 चाळी आहेत. सध्या या चाळी मोडकळीस आल्या आहेत. मुंबईतील कापड गिरण्यांच्या चाळींच्या इमारतीचा पुनर्विकास, डीसीपीआर 2034 तरतुदींनुसार जमीन मालक एनटीसीसाठी अनिवार्य आहे.

या चाळींमधील प्रत्येक रहिवाशाच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी आणि विकास नियमन आणि प्रोत्साहन नियमन (डीसीपीआर) तरतुदींचे पालन करण्यासाठी, एनटीसीने  संभाव्य विकास संकल्पना, कार्यपद्धतीची आखणी , विकासकाच्या नियुक्तीसाठी निविदा कागदपत्रे तयार करणे आणि एनटीसी चाळींच्या पुनर्विकासाच्या निविदा प्रक्रियेत सहाय्य  करण्यासाठी एक सल्लागार नेमला  आहे.

एनटीसी चाळींच्या पुनर्विकासासाठी म्हाडाच्या पॅनेलवरील वास्तुविशारदांशी, म्हणजेच आर्किटेक्ट यांच्याशी सल्लामसलत करून योग्य पद्धतीने विकसित करण्याचे काम  सल्लागाराने सुरू केले आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला,  बिगर उपकरप्राप्त 5 चाळींचे उपकरप्राप्त चाळींमध्ये रूपांतरीत करण्याची विनंती केली आहे, जेणेकरुन  म्हाडाद्वारे या चाळींची वेळेवर देखभाल भविष्यात करता येईल.

चर्चेदरम्यान, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हाडा आणि एमएमआरडीएच्या  अधिकाऱ्यांना पुनर्विकास आणि पुनर्वसन प्रक्रियेला गती देण्याचे तसेच यासाठी एनटीसीला आवश्यक ते सर्व  सहाय्य प्रदान करण्याचे निर्देश दिले. गोयल यांनी एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांना एनटीसी बरोबर समन्वयाने काम करण्याचे आणि एनटीसीला टीडीआरच्या मुद्रीकरण  प्रक्रियेत मदत करण्याचे निर्देश दिलेले आहेत, जेणेकरून पुनर्वसनाचे कार्य जलद गतीने होईल.