महानगर (Mahanagar) कंपनीनं एक निवेदन काढून याविषयीची माहिती दिली. या कपातीनंतर सीएनजीच्या नवीन किंमती 79 प्रति किलो आणि देशांतर्गत पीएनजी 7 एप्रिल 2023च्या मध्यरात्रीपासून 49 रुपये प्रति एससीएम (SCM) होतील. देशातील नैसर्गिक वायूच्या किंमती निश्चित करण्यासाठी केंद्रानं नवीन पद्धतीला मान्यता दिल्यानंतर लगेचच एमजीएलनं निर्णय घेतला. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळालाय.
Table of contents [Show]
नैसर्गिक वायूचा वापर वाढविण्यात मदत
सरकारचं हे पाऊल घरगुती आणि वाहतूक क्षेत्रात नैसर्गिक वायूचा वापर वाढविण्यात मदत करेल. देशाला स्वच्छ आणि हरित बनवण्याच्या दिशेनं हे एक पुढचं पाऊल आहे, असं एमजीएलनं आपल्या एका निवेदनात म्हटलं आहे. घरगुती गॅसच्या किंमतीतल्या या कपातीचा फायदा घरगुती पीएनजी आणि सीएनजी ग्राहकांना मिळणार आहे.
फेब्रुवारीमध्ये प्रति किलो 2.5 रुपयांनी कमी केले होते दर
या वर्षी फेब्रुवारीमध्ये एमजीएलनं सीएनजीचे दर प्रति किलो 2.5 रुपयांनी कमी केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या गॅसच्या किंमतीवरील आंतरराष्ट्रीय गॅसच्या किंमतीतल्या वाढीचा परिणाम कमी करण्याचा प्रयत्न केलाय. ग्राहकांच्या हिताचं रक्षण करण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आलाय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचं मोदींनी स्वागत केलं. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी यांचं ट्विट शेअर करताना पंतप्रधानांनीही ट्विट केलंय. सुधारित घरगुती गॅसच्या किंमतीबाबत मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे ग्राहकांना अनेक बाजूने फायदे आहेत. हा या क्षेत्रासाठी सकारात्मक विकास आहे, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.
The Cabinet decision relating to revised domestic gas pricing has many benefits for the consumers. It is a positive development for the sector. https://t.co/CT1d0eLwra
— Narendra Modi (@narendramodi) April 7, 2023
स्थानिक पातळीवर उत्पादित गॅसची किंमत निश्चित
स्थानिक पातळीवर उत्पादित नैसर्गिक वायूची किंमत भारतीय क्रूड बास्केटच्या मासिक सरासरीच्या 10 टक्के असणार आहे. आदल्या दिवशी केंद्रानं ओएनजीसी आणि ऑइल इंडियासाठी USD 6.5/mmBtu आणि इतरांसाठी USD7.92 स्थानिक पातळीवर उत्पादित गॅसची किंमत निश्चित केलीय. पेट्रोलियम प्लॅनिंग आणि अॅनालिसिस सेलच्या आदेशानुसार, 8-30 एप्रिलसाठी नैसर्गिक वायूची किंमत कच्च्या तेलाच्या आयात खर्चाच्या 10 टक्के किंमतीच्या नवीन निर्देशांकानुसार USD 7.92/mmBtu (दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिट) एवढी आहे. मंत्रिमंडळानं किंमतीचं सूत्र बदलताना USD 6.5/mmBtu दर मर्यादित केले आहेत.
गॅसच्या किंमतीच्या सूत्रात सुधारणा
ओएनजीसी आणि ओआयएलनं त्यांच्या नामांकन क्षेत्रातून उत्पादित केलेल्या गॅससाठी, किंमत USD 6.5/mmBtuच्या कमाल मर्यादेच्या अधीन असेल, असं आदेशात म्हटलंय. मंत्रिमंडळानं किरीट पारिख पॅनेलनं प्रस्तावित केलेल्या गॅसच्या किंमतीच्या सूत्रात सुधारणा केली आणि स्थानिक पातळीवर उत्पादित सीएनजी आणि पाइप्ड स्वयंपाकाच्या गॅसची किंमत, आंतरराष्ट्रीय क्रूडच्या किंमतीच्या १० टक्क्यांवर मर्यादित केली.
पाइपच्या स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती शहरांमध्ये 10 टक्क्यांपर्यंत कमी
नवीन फॉर्म्युला एपीएम (प्रशासित किंमत यंत्रणा) गॅस म्हणून ओळखल्या जाणार्या जुन्या फील्डमधून तयार केलेल्या नैसर्गिक वायूवर लागू होईल. यानुसार, एपीएम गॅसची किंमत भारतीय क्रूड बास्केटच्या किंमतीच्या 10 टक्के असेल, परंतु दर USD 6.5/mmBtuवर मर्यादित असेल. USD 4/mmBtuची मूळ किंमतही असणार आहे. नवीन कमाल मर्यादा USD 8.57/mmBtuच्या सध्याच्या दरापेक्षा कमी आहे आणि पाइपयुक्त स्वयंपाकाचा गॅस तसंच ऑटोमोबाइलना विकल्या जाणार्या सीएनजीच्या किंमतीत 10 टक्क्यांनी घट होईल. पाइपच्या स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती शहरांमध्ये 10 टक्क्यांपर्यंत कमी केल्या जातील, तर सीएनजीमध्ये थोडीशी कपात होईल, असं सरकारनं म्हटलंय.