Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Paishanvar Bolu Kahi: अलिबागमधील सारळ गावात महिलांनी गिरवले अर्थसाक्षरतेचे धडे

Paishanvar Bolu Kahi programme at Saral, Alibaug

Paishanvar Bolu Kahi: समाजातील शेवटच्या घटकाला आर्थिक साक्षर करण्यासाठी 'महाMoney'ने आर्थिक साक्षरतेवर सुरू केलेल्या 'पैशांवर बोलू काही' या पहिल्या कार्यक्रमाला अलिबागमधील सारळ गावातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात महिलांनी अर्थसाक्षरतेचे धडे गिरवले.

Paishanvar Bolu Kahi: समाजातील शेवटच्या घटकाला अर्थसाक्षर करण्यासाठी 'महाMoney'या वित्तीय साक्षरतेवर काम करणाऱ्या मुंबईस्थित मल्टीमिडिया कंपनीने शनिवारी 20 जानेवारी 2023 रोजी अलिबागमधील सारळ गावात 'पैशांवर बोलू काही' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सारळ आणि परिसरातील महिला बचत गटांच्या शेकडो महिलांनी या कार्यक्रमातून अर्थसाक्षरतेचे धडे गिरवले. दैनंदिन जीवनातील बचत आणि गुंतवणुकीच्या सोप्या टीप्स  महाMoneyमधील तज्ज्ञांनी सादरणीकरणासह स्पष्ट केल्या.

सारळ गावातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात दुपारी 3 वाजता महाMoneyचा 'पैशांवर बोलू काही' हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. चूल आणि मूल यामध्ये गुंतून राहणाऱ्या सारळमधील बचत गटातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला दिला. सारळच्या ग्रामसेविका निशा चंदनकर यांनी कार्यशाळेचा उद्देश सांगितला. तर सरपंच अमृता नाईक यांनी  महाMoneyच्या टीमचे स्वागत केले.

Distribution of gifts
सारळ गावातील बचत गटातर्फे महामनीच्या टीमचे स्वागत करण्यात आले.

'पैशांवर बोलू काही' या कार्यक्रमाची सुरुवात महाMoneyच्या टीम मेंबर ऋुजुता लुकतुके यांच्या सादरीकरणाने झाले. पैसा किती महत्त्वाचा, संपत्ती म्हणजे काय? या मुद्द्यांना हात घालत लुकतुके यांनी महिलांनी बचत कशी करावी, यावर सोप्या टिप्स दिल्या. त्यानंतर वित्तीय सेवा क्षेत्रात दीर्घकाळ काम करणारे आर्थिक साक्षरता प्रशिक्षक दत्तात्रय काळे यांनी दीर्घकाळ संपत्ती निर्मितीचे विविध पर्याय, म्युच्युअल फंड, शेअर मार्केटमधील गुंतवणूक, विम्याचे महत्त्व यासारख्या विषयांचे सोप्या भाषेत सादरणीकरण केले. अंकुश बोबडे यांनी महिलांनी डिजिटल बँकिंग सेवा कशी वापरावी, कोणत्या सेवा बँकांकडून दिल्या जातात याची माहिती दिली. तर कैलास रेडीज यांनी डिजिटल गोल्ड या नव्या गुंतवणूक पर्यायाची माहिती उपस्थित महिलांना दिली. त्याचबरोबर सायबर हल्ले आणि ऑनलाईन होणारी आर्थिक फसवणूक कशी टाळावी याविषयी खबरदारीचे उपाय ही सांगितले. 

आयुष्यातील दुर्लक्षित पण भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या आणि दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या आर्थिक प्रश्नांबाबत माहिती मिळत असल्याने तब्बल तीन तास सारळमधील महिलांनी एकाग्रतेने या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. ग्रामपंचायत सारळ आणि  महाMoney यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.