चीन हे ॲपल कंपनीचे अधिकृत उत्पादन केंद्र आहे. मात्र, कोरोनामुळे असलेले निर्बंध आणि इतर अडचणींमुळे ॲपलच्या उत्पादकतेवर परिणाम झाला. यानंतर कंपनीने इतर देशातही उत्पादनास सुरुवात केली.अमेरिकन स्मार्टफोन कंपनी ॲपलने भारतात आयफोनचे उत्पादन व निर्यात वाढवली आहे. कंपनीने डिसेंबर महिन्यात देशात एक अब्ज डॉलर म्हणजेच 8,100 कोटी रुपयांच्या आयफोन्सची निर्यात केली.
जागतिक मंचावर भारत सरकारने केले जाहीर
ईलेक्ट्रॉनिक्स व आयटी सचिव, अल्केश कुमार शर्मा यांनी G20 मंचावर डिसेंबरमध्ये भारताने 1 अब्ज डॉलर्सचे आयफोन जागतिक व्यापारी समुदायाला माहिती दिली. त्यांनी सांगितले की केंद्र सरकारने भारताला सेवांमधून उद्योग क्षेत्रात पुढे नेण्यासाठी काही काही योजना सुरू केल्या आहेत.भारतात इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर व सेमीकंडक्टर यांची निर्मिती करण्यासाठी एक एकोसिस्टिम तयार केली जात आहे.स्मार्टफोन निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची निर्मिती भारतात झाली पाहिजे यावर सरकार भर देत आहे.
ॲपल ही आणखी एक यशोगाथा उद्योग मंत्री
भारताचे वाणिज्य व उद्योग मंत्री यांनी कंपनीच्या कार्याचा अहवाल व योजनेची माहिती दिली. ते म्हणाले "ॲपल ही आणखी एक यशोगाथा आहे या कंपणीमुळे भारताला उद्योग हातळण्याचे अधिक कौशल्य प्राप्त झाले आहे. इतर देशांच्या स्पर्धात्मक तुलेनेने भारताची उत्पादन क्षमता खूप कमी कालावधीत वाढली आहे. कंपनीचे भारतात 5% ते 7% उत्पादन केले जाते. येणाऱ्या काळात ॲपलला हे प्रमाण वाढवून 25% पर्यंत न्यायचे आहे.देशातील कंत्राटी आयफोन निर्माती कंपनी फॉक्सकॉनने भारतातील ॲपल कंपनीतील कामगारांची संख्या येणाऱ्या काळात चार पटीने वाढवली जाईल असे जाहीर केले आहे.