गुंतवणूक करताना कमी जोखीम घेणाऱ्यांसाठी मुदत ठेव हा एक पर्याय आहे. इक्विटी, शेअर मार्केट गुंतवणुकीपेक्षा यात परतावा कमी असतो. मात्र, गुंतवणूक सुरक्षित राहते. Deposit Insurance and Credit Guarantee Corporation द्वारे 5 लाखांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण देखील मिळते. अनेक स्मॉल फायनान्स बँकाचा समावेश DICGC मध्ये आहे. ज्येष्ठ नागरिकांना स्मॉल फायनान्स बँकेतील गुंतवणुकीतून 9% पेक्षा जास्त परतावा मिळू शकतो.
ज्येष्ठ नागरिकांना 9% पेक्षा जास्त परतावा देणाऱ्या बँका
युनिटी स्मॉल फायनान्स बँक (Unity Small Finance Bank)
युनिटी स्मॉल फायनान्स बँक सर्वसामान्य नागरिकांना मुदत ठेवींवर 9% पर्यंत व्याजदर देते. तर ज्येष्ठ नागरिकांना 9.50% पर्यंत व्याज दर देतात. 1001 दिवसांच्या मुदत ठेवीवर ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक 9.50% व्याजदर मिळतो. हे नवे दर 14 जून 2023 पासून लागू झाले आहेत. वेळेआधीच गुंतवणूक काढून घेतली तर 1% दंड लागू होईल. याबाबत सविस्तर माहिती बँकेच्या संकेतस्थळावर मिळेल.
जन स्मॉल फायनान्स बँक (Jana Small Finance Bank)
जन स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर 9% पर्यंत व्याजदर देते. 366 दिवस ते 2 वर्षांच्या आतील मुदत ठेवींना हा व्याजदर लागू आहे.
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक (Fincare Small Finance Bank)
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक मुदत ठेवींवर 9.11% पर्यंत व्याजदर देते. सर्वसामान्य नागरिकांना बँक 3% ते 8.5% मुदत ठेवींवर व्याजदर देते. सर्वाधिक 9.11% व्याजदर 1000 दिवसांच्या मुदत ठेवींवर दिलं जाते. 25 मे 2023 पासून नवे दर लागू झाले आहेत.
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक (Equitas Small Finance Bank)
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक 444 दिवस आणि 888 दिवसांच्या मुदत ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना 9% व्याजदर देते. तर सर्वसामान्य नागरिकांना 8.50% व्याजदर देते. नवे दर 5 जून 2023 पासून लागू झाले आहेत.
इएसएएफ (ESAF Small Finance Bank)
ESAF स्मॉल फायनान्स बँक दोन ते तीन वर्षांच्या मुदत ठेवींवर 9% व्याजदर देते. तर सर्वसामान्य नागरिकांना 8.50% व्याजदर देते. नवे दर एप्रिल 2023 पासून लागू झाले आहेत.
सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक (Suryoday Small Finance Bank)
सुर्योदय स्मॉल फायनान्स बँके पाच वर्षांच्या मुदत ठेवींवर 9.60% पर्यंत व्याज देते. बँक 4.50% पासून 9.60% पर्यंत व्याजदर देते. 999 दिवसांच्या मुदत ठेवींवर बँक 9% व्याजदर देते. सर्वसामान्य नागरिकांना बँक पाच वर्षांच्या मुदत ठेवींवर 9.10% व्याजदर देते. हे नवे दर 1 जून 2023 पासून लागू झाले आहेत.