Increase in insurance premium : आर्थिक साक्षरता दिवसेंदिवस वाढत आहे. विम्याचे महत्त्व लक्षात आले तेव्हापासून अनेकांनी त्यात गुंतवणूक केली. पण आता ग्राहकांसाठी जीवन विमा मिळवणे अधिक महाग होत चालले आहे. कारण विमा पॉलिसीच्या प्रिमियमच्या रकमेत सतत वाढ होत आहे. महागड्या जीवन विम्याचा थेट परिणाम लोकांच्या खिशावर आणि बचतीवर का होत आहे. सर्व सामान्यांचा विचार केला असता जेमतेम पगार असणाऱ्या व्यक्तीला हे सर्व खूप कठीण जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हंसा रिसर्चने एक सर्वेक्षण केले आहे, ज्यानुसार जीवन विमा खरेदी करताना कोणत्याही ग्राहकासमोर तीन सर्वात मोठ्या समस्या येत आहेत. ज्यामध्ये विमा खरेदीच्या आधीचा पूर्वग्रह आर्थिक अडचणी आणि परवडणारी क्षमता यांचा समावेश होतो.
हा अहवाल देशभरातील 3300 पॉलिसीधारकांच्या प्रतिसादाच्या आधारे तयार करण्यात आला आहे. पॉलिसीधारकांना त्यांचा अनुभव विचारण्यात आला. सर्वेक्षणात, 22 टक्के पॉलिसीधारकांनी सांगितले, की ते पॉलिसी बंद करतात. कारण कंपनी आपल्या ग्राहकांशी संपर्क ठेवत नाही. 10 पैकी 8 ग्राहकांचे म्हणणे आहे, की दर सहा महिन्यांनी बँकेच्या प्रादेशिक व्यवस्थापक, एजंटने ग्राहकाला फोन करावा किंवा भेटावे.
ग्राहकांच्या प्रवासातही डिजिटल वर्तन वाढत आहे, मग ती कंपनीच्या वेबसाइटवरील खरेदीपूर्व माहिती असो किंवा पेमेंट रिमाइंडरसारखी वैशिष्ट्ये असोत. यासोबतच डिजिटल सेवेमध्ये ब्रँड परसेप्शन, ऑनलाइन शॉपिंग, कस्टमर सपोर्ट सर्व्हिस सोबतच खूप महत्त्व आहे.
देशांतर्गत कंपन्या आणि मोटार वाहन मालकांसाठी विमा काढणे महाग पडू शकते, अशी बातमी अलीकडेच आली होती. कारण जागतिक पुनर्विमा कंपन्या त्यांचे दर 40 ते 60 टक्क्यांनी वाढवू शकतात कारण रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर या कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. तुमच्या विम्याचे प्रीमियम 10 टक्क्यांपर्यंत महाग होऊ शकते.
(Source: www.abplive.com)