Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Life Insurance for Disabled Person: दिव्यांग असल्यास आयुर्विमा पॉलिसी काढता येते का? जाणून घ्या सविस्तर

Life Insurance for Disabled Person

Life Insurance for Disabled Person: जीवन विमा पॉलिसी धारकाने प्रीमियम भरल्यास अनपेक्षित मृत्यूनंतर कंपनी पैसे देण्याची हमी देते. मात्र शारीरिक अपंगत्व आल्यास व्यक्ति या जीवन विम्यासाठी पात्र असते का? हा प्रश्न सर्वांनाच असतो. काहीवेळी जीवन विमा काढतांना शारीरिक तपासणी होते कुठलाही दुर्धर आजार असतांना बऱ्याच कंपन्या हा विमा काढत नाही.

जीवन विम्याचा प्रमुख उद्देश म्हणजे व्यक्तीच्या मृत्यूनंतरचे त्याच्या वारसांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे. म्हणजेच पॉलिसीधारकावरील कर्ज, मृत्यूपश्चात होणाऱ्या खर्चाचा भार उचलणे. अपंगत्व आल्यास हा जीवन विमा खरेदी करणे अडचणीचे ठरु शकते. मात्र चिंता करु नये, अपंगत्व आल्यास आपण जीवन विमा खरेदीसाठी पात्र असतो. अपंग व्यक्तीचा जीवन विमा काढताना विमा कंपनी कोणत्या गोष्टींची पडताळणी करते ते जाणून घेऊया.

अपंगत्वाचे स्वरुप (Nature of Disability)

शारीरिक अपंगत्व, जसे की दृष्टी किंवा श्रवणशक्ती कमी होणे. कारण याचा व्यक्तीच्या आयुर्मानावर तेवढा परिणाम होत नाही. कुष्ठरोगातून किंवा मज्जासंस्थेतून येणारे अपंगत्व  ज्याचा आयुष्यावर थेट परिणाम होतो, असे अपंगत्व असल्यास विमा कंपनी संबधित ग्राहकाची विमा पॉलिसी काढण्यास नकार देते.  

वैद्यकीय उपचार आणि हिस्ट्री(Medical Treatment and History)

जीवन विमा काढताना विमा कंपनी वर्तमान आणि मागील वैद्यकीय उपचारांचा विचार करते. व्यक्ती घेत असेलली औषधे, शस्त्रक्रिया हे लक्षात घेऊन विमा कंपनी काही प्रश्न अर्जदाराला विचारते. यामुळे अर्जदाराच्या वैद्यकीय माहितीचा आढावा घेऊन एक अहवाल तयार करावा लागतो. या अहवालातील गांभीर्यानुसार विमा कंपनी हा विमा काढण्याची परवानगी देते.

अर्जदाराचा रोजगार (Applicant's Employment)

अर्जदार नोकरी करणारा असल्यास विमा कंपनी तत्काळ परवानगी देते. कारण स्थिर रोजगारासाठी आरोग्य गरजेचे आहे. उत्पन्न नियमित असल्यास अर्जदार प्रीमियम देखील नियमित जमा करू शकतो. यामुळे अर्जदाराची क्षमता लक्षात घेऊन कंपनी या विम्याचे स्वरूप निश्चित करते.

अर्जदाराच्या सवयी (Habits of the applicant)

जीवन विमा काढतांना अर्जदारच्या सवयी लक्षात घेतल्या जातात. धूम्रपान, मद्यपान किंवा इतर अमली पदार्थांचे सेवन अर्जदार करत असेल तर विमा कंपनीकडून खबरदारीची भूमिका घेतली जाते. कारण या पदार्थांचे सेवन आरोग्यास हानिकारक असते. तरीही अर्जदार या गोष्टींच्या आहारी गेला असेल तर विमा कंपन्यांसाठी हा विमा काढून देणे धोक्याचे ठरते. कारण अर्जदार स्वतः आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही. काही विपरीत घडल्यास तो या परिस्थितीला जबाबदार असतो.

मुदत जीवन विमा व आजीवन विमा हे या पॉलिसीचे प्रमुख दोन प्रकार आहेत. मृत्यूनंतर सर्व प्रकारच्या कौटुंबिक आर्थिक गरजा व जबाबदारी पूर्ण करण्यासाठी हा जीवन विमा महत्वाचा ठरतो.अपंगत्व असूनही तुमच्या पश्चात कुटुंबाला एक आर्थिक संरक्षण मिळते. हा विमा काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास तुम्हाला कुठल्याही शारीरिक तपासणीची गरज भासत नाही.