भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC – Life Insurance Corporation) धन वर्षा ही नवी जीवन विमा योजना नुकतीच सादर केली आहे. ही क्लोज एंडेड योजना असून चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजेच ३१ मार्च २०२३ पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध असेल. ही योजना नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, वैयक्तिक, बचत, सिंगल प्रीमियम लाइफ इन्शुरन्स योजना आहे.
1 पॉलिसीच्या काळात पॉलिसी घेणाऱ्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास या योजनेत कुटुंबासाठी आर्थिक मदत केली जाते. त्याचप्रमाणे जिवंत जीवन विमाधारकांसाठी परिपक्वतेच्या (maturity) तारखेला गॅरंटीड एकरकमी रक्कम देखील देते.
2 मृत्यूपश्चात मिळणाऱ्या विम्याच्या परताव्यासाठी विमा धारकाकडे 2 पर्याय आहेत. 1. नियोजित विम्याच्या हप्त्यापेक्षा 1.25 पट 2. निवडलेल्या मूलभूत विमा रकमेच्या 10 पट प्रस्तावक/ विमाधारक 10 किंवा 15 वर्षांच्या कालावधीची निवड करु शकतो.
3 एलआयसीच्या धन वर्षा पॉलिसीमधील दोन्ही पर्यायांमध्ये, जर तुम्ही 15 वर्षांच्या मुदतीची निवड केली असेल, तर पॉलिसी घेण्याचे किमान वय 3 वर्षे असेल. जर तुम्ही 10 वर्षांची मुदत निवडली तर किमान वय 8 वर्षे असेल. दुसरीकडे, पहिल्या पर्यायामध्ये, तुमचे कमाल वय 60 वर्षे असावे आणि तुम्ही 10 पट जोखीम संरक्षण घेत असाल, तर तुम्ही 10 वर्षांच्या मुदतीसह 40 वर्षे वयापर्यंतच या योजनेत सामील होऊ शकाल. दुसऱ्या पर्यायामध्ये, जर तुम्ही 15 वर्षांची मुदत घेतली तर कमाल वय 35 वर्षे असेल.
4. किमान मूलभूत विमा रक्कम ₹ 1.25 लाख आहे आणि कमाल मूलभूत विमा रकमेसाठी कोणतीही मर्यादा नाही.
5. विमा पाॅलिसी प्रवेशाच्या वेळी जीवन विमा धारकाचे वय 8 वर्षांपेक्षा कमी असल्यास, पॉलिसी अंतर्गत जोखीम 1) पॉलिसी सुरू होण्याच्या तारखेपासून 2 वर्षांनंतर किंवा 2) वयाची 8 वर्षे पूर्ण होतील तो पॉलिस वर्धापनदिन किंवा त्यानंतरचा पहिला पॉलिस वर्धापनदिन यापैकी जे आधी असेल , तेव्हा सुरू होइल. 8 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी, पॉलिसी जारी केल्याच्या तारखेपासून जोखीम त्वरित सुरू होईल.
6. जर जीवन विमाधारक वेस्टिंग (पॉलिसी पूर्णत्वाच्या) तारखेला जिवंत असेल आणि पॉलिसीच्या पैशासाठी पात्र असलेल्या व्यक्तीकडून अशा निहित तारखेपूर्वी पॉलिसी सरेंडर करण्याची लेखी विनंती कॉर्पोरेशनला प्राप्त झाली नसेल तर पॉलिसी स्वयंचलितपणे अशा निहित तारखेला लाइफ अॅश्युअर्डमध्ये निहित असेल.
7. प्रत्येक पॉलिसी वर्षाच्या शेवटी, पॉलिसीच्या संपूर्ण मुदतीत गॅरंटीड अॅडिशन्स प्राप्त होतील. गॅरंटीड अॅडिशन्स निवडलेल्या पर्यायावर, मूलभूत विम्याची रक्कम आणि पॉलिसीच्या मुदतीवर अवलंबून असतील.
8. या योजनेअंतर्गत दोन वैकल्पिक रायडर्स उपलब्ध आहेत, एक म्हणजे – एलआयसीचा, अपघाती मृत्यू आणि अपंगत्व लाभ रायडर आणि दुसरा एलआयसीचा न्यू टर्म अॅश्युरन्स रायडर.
9. या योजनेत काही अटींच्या अधीन राहून पॉलिसीधारकासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध आहे.
10. काही अटींच्या अधीन राहून तुम्ही अशा योजना एजंट किंवा इतर मध्यस्थांद्वारे ऑफलाइन खरेदी करू शकता ज्यात पॉईंट ऑफ सेल्स पर्सन्स- लाइफ इन्शुरन्स (पीओएसपी-एलआय)/ कॉमन पब्लिक सर्व्हिस सेंटर्स (सीपीएससी-एसपीव्ही) आहेत.