Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC-IDBI Mutual Funds : आयडीबीआयच्या 20 म्युच्युअल फंडाचा एलआयसीकडे ताबा, गुंतवणूकदारांचे काय?

LIC-IDBI Mutual Funds : आयडीबीआयच्या 20 म्युच्युअल फंडाचा एलआयसीकडे ताबा, गुंतवणूकदारांचे काय?

LIC MF कडून आयडीबीआय म्युच्युअल फंडाच्या (IDBI MF) ज्या सर्वसामान्य 10 MF स्कीम आहेत. त्या LIC MF च्या योजनांमध्ये समाविष्ट केल्या जाणार आहेत. याशिवाय उर्वरित 10 स्कीम ज्या LIC MF कडे नाहीत त्या स्वतंत्रपणे सुरू ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये IDBI गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड, IDBI गोल्ड फंड, IDBI स्मॉल कॅप, IDBI मिडकॅप फंड, IDBI लाँग टर्म व्हॅल्यू फंड इत्यादी स्कीमचा समावेश असेल

भारत सरकारकडे मालकी असलेल्या एलआयसीने आयडीबीआयच्या म्युच्युअल फंडाचा (IDBI-MF) ताबा मिळवला आहे. एलआयसी म्युच्युअल फंडामध्ये (LIC-MF) आणि आयडीबीआयच्या म्युच्युअल फंडाचे विलीनीकरण (LIC MF-IDBI MF merger) करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या संदर्भात एलआयसी एमएफकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. आयडीबीआय एमएफ च्या एकूण 20 स्कीमचा यामध्ये समावेश आहे.

10 स्कीम होणार मर्ज-

एलआसी म्युच्युअल फंड ने आयडीबीआय म्युच्युअल फंडांचे पूर्णता विलीनीकरण ( LIC-IDBI Mutual Funds) करून घेतले आहे. त्यामध्ये एकूण 20 स्कीमचा समावेश आहे.  विलीनीकरणानंतर आता LIC MF कडून  आयडीबीआय म्यु्च्युअल फंडाच्या (IDBI MF) ज्या सर्वसामान्य 10 म्युच्युअल फंडांच्या स्कीम आहेत. त्या LIC MF च्या योजनांमध्ये समाविष्ट केल्या जातील. याशिवाय इतर 10 स्कीम ज्या एलआसी कडे नाहीत त्या स्वतंत्रपणे सुरू ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये IDBI गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड, IDBI गोल्ड फंड, IDBI स्मॉल कॅप फंड, IDBI मिडकॅप फंड, IDBI लाँग टर्म व्हॅल्यू फंड यासह इतर स्कीमचा समावेश असेल. विलिनीकरण प्रक्रियेनंतर LIC MF च्या एकूण स्कीमचा आकडा हा 38000 वर पोहोचला आहे.

मालमत्ता वाढीसाठी निर्णय-

या अधिग्रहणाच्या निर्णय प्रक्रियेबाबतची माहिती देताना LIC ने म्हटले आहे की, व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता वाढीसाठी (AUM)आम्ही हा निर्णय घेतला. तसेच एलआयसी आपल्या योजना आणि उत्पादनामध्ये विविधता आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले . या आर्थिक वर्षात जूनपर्यंत एलआयसी कंपनीची व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता  ही 18400 कोटी रुपये इतकी होती. तर दुसरीकडे आयडीबीयच्या म्युच्युअल फंडाचा एकूण निधी 3650 कोटी रुपये होता.

गुंतवणूकदारांना मिळणार लाभ-

दरम्यान, या विलिनीकरणाच्या प्रक्रियेमुळे ज्या गुंतवणूकदारांनी आयडीबीयाय म्युच्युअल फंडाच्या विविध स्कीममध्ये गुंतवणूक केली होती. त्यांना आता एलआयसी म्युच्युअल फंडातील योजनांप्रमाणे लाभ मिळणार आहे. या गुंतवणूकदारांना एलआयसीच्या विविध योजना अथवा उत्पादनांमध्ये भागिदारी, डेट, हायब्रिड, सोल्यूशन ओरिएंटेड थीम, इंडेक्स फंड यांचा लाभ मिळू शकेल.