• 05 Feb, 2023 13:11

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC Jeevan Tarun:150 रुपये दिवसाला गुंतवा, 12 वर्षांत मिळवा मोठी रक्कम!

LIC

Image Source : www.tractorjunction.com

LIC Jeevan Tarun योजना तरुण पालकांसाठी वरदान ठरू शकते. तुमची मुले मोठी झाल्यावर त्यांच्या शैक्षणिक निधीची पूर्तता करण्यासाठी तुम्ही ही योजना घेऊ शकता. तसेच त्यांच्या लग्नासाठी किंवा इतर गरजेच्या खर्चासाठी देखील ही योजना फायदेशीर ठरू शकते.

भारतीय आयुर्विमा महामंडळ प्रत्येक वर्गासाठी विविध विमा योजना तयार करण्यासाठी ओळखले जाते. LIC च्या बहुतेक योजना जीवन विमा तसेच गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याची हमी देतात. एलआयसी ही बाजारपेठेतील अग्रणी आहे कारण ती सर्व वयोगटातील आणि समाजातील प्रत्येक घटकाला समोर ठेऊन निरनिराळ्या विमा योजना बनवत असते.

अशीच एक पॉलिसी म्हणणे एलआयसी जीवन तरुण (LIC Jeevan Tarun Policy). LIC जीवन तरुण तुमच्या भविष्यातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी उपयोगी ठरू शकते. दररोज 150 रुपयांपेक्षा कमी किंमतीची गुंतवणूक केली तरीही तुम्हांला चांगला परतावा मिळू शकतो. या योजनेचा कालावधी इतर योजनांच्या तुलनेत कमी आहे. एलआयसी जीवन तरुण योजनेचे काही मूलभूत तपशील खाली दिलेले आहेत.

LIC जीवन तरुण ही एक नॉन-लिंक्ड (Non-Linked), सहभागी (Participating) योजना आहे. हे अल्पकालीन निधीसाठी (Short term fund) डिझाइन केलेली योजना आहे. LIC ही योजना पॉलिसीधारकाला एलआयसी कव्हरचा (LIC Cover) लाभ देखील देते. ही योजना तरुण पालकांसाठी वरदान ठरू शकते. तुमची मुले मोठी झाल्यावर त्यांच्या शैक्षणिक निधीची पूर्तता करण्यासाठी तुम्ही ही योजना घेऊ शकता. तसेच त्यांच्या लग्नासाठी किंवा इतर गरजेच्या खर्चासाठी देखील ही योजना फायदेशीर ठरू शकते.

25 वर्षांच्या विमा संरक्षणासाठी तुम्ही 20 वर्षांसाठी पैसे गुंतवू शकता. किमान विम्याची रक्कम 75000 रुपये इतकी आहे आणि कमाल विमा रकमेसाठी कोणतीही मर्यादा नाही. या योजनेत तुम्ही मासिक, त्रैमासिक आणि सहामाही आणि वार्षिक प्रीमियम भरू शकता.ही योजना 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी खरेदी केली जाऊ शकत नाही. वय वर्षे 12 च्या आत असलेले पाल्य या योजनेसाठी पात्र आहेत. वयाची 25 वर्षे पूर्ण झाल्यावर पाल्याला पॉलिसीचे पैसे मिळतील. याचाच अर्थ मुल 25 वर्षांचे होईपर्यंत प्लॅन सुरू राहील.

तुम्ही या प्लॅनवर दररोज 150 रुपये खर्च केल्यास, जे दरमहा 4500 रुपये तुम्ही गुंतवणूक करू शकाल. तुमचे मुल 25 वर्षाचे  झाल्यावर तुम्हाला 8.44 लाख रुपये मिळतील. ( ही गणना LIC योजना खरेदी केली तेव्हा मुलाचे वय 12 वर्षे आहे या गृहीतावर आधारित आहे.)

म्हणजेच एक चांगली बचत करून तुम्ही भविष्यासाठी आर्थिक तजवीज उत्तमपणे करू शकता.