Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC IPO: पॉलिसीधारकांनी अर्ज करण्यापूर्वी या गोष्टींची माहिती घ्या

LIC IPO: पॉलिसीधारकांनी अर्ज करण्यापूर्वी या गोष्टींची माहिती घ्या

लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा (LIC) आयपीओ 4 मे, पासून खुला होणार असून 9 मे पर्यंत गुंतवणूकदार यासाठी अर्ज करु शकतात. ऑनलाईन पद्धतीने आयपीओसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून एकूण 3.5 टक्के शेअरची विक्री करणार असून यातून 21 हजार कोटी रूपयांचा निधी उभारणार आहे. आयपीओसाठी कंपनीने प्रती शेअर 902  ते 949 रुपये अशी किंमत निश्चित केली असून यासाठी 15 शेअर्सचा एक लॉट असणार आहे. दरम्यान एलआयसीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी आयपीओबाबत अधिक माहिती करून घेणं आवश्यक आहे.

वैयक्तिक गुंतवणूकदार आणि एलआयसी कर्मचाऱ्यांना प्रती शेअर्सवर 45 रुपयांची तर एलआयसी पॉलिसीधारकांना प्रत्येक शेअर्सवर 60 रुपयांची सवलत देण्यात आली आहे. एलआयसीच्या आयपीओसाठी एलआयसी पॉलिसीधारक आणि सर्वसामान्य गुंतवणूकदार खालीलप्रमाणे अर्ज करू शकतात. सर्वप्रथम, पॉलिसीधारकांनी त्यांची पॉलिसी पॅनकार्डला (PAN) लिंक केली आहे की, नाही याची खात्री करून घेणं आवश्यक आहे. तसेच तुमच्याकडे डीमॅट खाते हवे आणि ते तुमच्या पॅन कार्ड क्रमांकाशी जुळणारे हवे.

एलआयसी पॉलिसीधारकांसाठी

एलआयसी पॉलिसीधारकांनी पॉलिसी पॅनकार्डला खालीलप्रमाणे लिंक करू शकता.

  1. पॉलिसी पॅनकार्डला लिंक करण्यासाठी एलआयसीच्या वेबसाईटवर जा.
  2. अटेंशन मथळ्यांतर्गत दिलेल्या सूचनांमध्ये उपलब्ध असलेल्या 'प्रोसीड' (Proceed) पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  3. इथे पॅन कार्डवर दिल्यानुसार जन्मतारीख टाका. त्यानंतर लिंग, ईमेल आयडी, पॅनकार्ड क्रमांक, पॅननुसार पूर्ण नाव, नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि पॉलिसी क्रमांक टाका. जर तुमच्याकडे जास्ती पॉलिसी असतील, तर तुम्ही 'पॉलिसी जोडा' या पर्यायातून आणखी पॉलिसी जोडू शकता. 
  4. वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यावर डिक्लेरेशन (deceleration) चेकबॉक्सवर क्लिक करा.
  5. स्क्रीनवर दिलेला कॅप्चा आहे तसा टाका आणि गेट ओटीपी (Get OTP) पर्यायावर क्लिक करा.
  6. एलआयसी (LIC) कडून तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. तो ओटीपी टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.
  7. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्ही केलेल्या विनंतीनुसार प्रक्रिया पूर्ण झाल्याचा संदेश येईल.

यानंतर तुम्ही तुमची पॉलिसी पॅनकार्डला लिंक झाली आहे की नाही हे इथे तपासू शकता. तुमची पॉलिसी पॅनकार्डला लिंक झाली की, तुम्ही विविध माध्यमातून आयपीओसाठी अर्ज करू शकता.

युपीआय (UPI App) अॅपद्वारे आयपीओसाठी अर्ज करू शकता

नॅशनल पेमेंट्स ऑफ कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NCPI)ने परवानगी दिलेल्या युपीआय अॅप्सद्वारे आयपीओसाठी अर्ज करता येऊ शकेल. एनसीपीआयने भीम अॅप (BHIM) बँक ऑफ बडोदा, आयडीबीआय बँक, युपीआय (UPI), ए यू स्मॉल फायनान्स बँक, अॅक्सिस बँक, बंधन बँक, एसबीआय बॅंक, येस बँक, आयसीआयसीआय बँक, एचएसबीसी बॅंक यांच्याबरोबरच फ्रीचार्ज (Freecharge), पेटीएम (Paytm), गुगल पे (Google Pay), फोन-पे (Phone-Pe) आणि मोबिक्विक युपीआय (MobiKwik UPI) वापरून आयपीओ खरेदी करण्यास परवानगी दिली आहे.

इंटरनेट बँकिंगद्वारे असा अर्ज करा

  1. ऑनलाईन नेट-बँकिंग खात्यात लॉग-इन करून गुंतवणूक (Investment) या टॅबमध्ये जा. 
  2. गुंतवणूक टॅबमध्ये IPO/e-IPO पर्यायावर क्लिक करा.
  3. इथे तुम्हाला डिपॉझिटरी आणि बँक खात्याचे तपशील भरावे लागतील. त्यानंतर पडताळणी प्रक्रिया पूर्ण होईल.
  4. पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, गुंतवणूकदारांनी 'IPO मध्ये गुंतवणूक करा' पर्यायावर क्लिक करणे आवश्यक आहे.
  5. त्यानंतर तुम्ही ज्या IPO साठी अर्ज करू इच्छिता तो निवडून समभागांची संख्या आणि बिड किंमत टाका.
  6. सर्व माहिती भरून झाल्यानंतर 'आता अर्ज करा' (Apply Now) पर्याय निवडू शकता.
  7. अर्ज केल्यानंतर बँक अर्जाची रक्कम आयपीओची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ब्लॉक करते.
  8. शेअर्सचे वाटप झाल्यानंतर बॅंक खात्यातून रक्कम वजा केली जाते.

गुंतवणूकदार शेअर्सच्या वाटपाचा तपशील स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर जाऊन तपासू शकतात.