Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC Claim Settlement: इन्शुरन्स क्लेमध्ये 'LIC' बेस्ट! आयुर्विमा महामंडळाकडून 98% मृत्यू दाव्यांमध्ये वारसांना भरपाई

LIC Death Claim Settlement Ratio

Image Source : www.ndtv.com

मृत्यूचे दावे निकाली काढण्यामध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळाने इतर विमा कंपन्यांच्या तुलनेत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये एलआयसीने 96% मृत्यूचे दावे निकाली काढले असून वारसांना भरपाई दिली आहे.

भारतीयांचा विश्वास सार्थ ठरवत एलआयसी पुन्हा एकदा इतर विमा कंपन्यांच्या तुलनेत सरस ठरली आहे.विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या (IRDAI) आकडेवारीनुसार भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC had highest death claims ratio in fy 22) आर्थिक वर्ष 2022 मध्ये 96% मृत्यूचे दावे निकाली काढले आहेत.

मृत्यू झालेल्या विमा धारकांच्या वारसांना एलआयसीने 28408 कोटींची भरपाई दिली. एलआयसीकडे  29585 कोटींचे मृत्यू दावे दाखल झाले होते. त्यातील 96% दाव्यांची एलआयसीने भरपाईसह पूर्तता केली.एलआयसीचे दावे पूर्तीचे प्रमाण (Death Claim Settlement Ratio) 98.2% इतके आहे.

मृत्यूचे दावे निकाली काढण्याचे खासगी क्षेत्राचे प्रमाण 94% इतके आहे. वर्ष 2022 मध्ये खागसी क्षेत्रातील कंपन्यांकडे 18494 कोटींचे मृत्यू दावे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 17409 कोटींचे दावे मान्य करुन संबधित वारसांना भरपाई देण्यात आल्याचे आयआरडीएच्या अहवालात म्हटले आहे.खासगी क्षेत्राचे दावापूर्तीचे प्रमाण 94.4% इतके आहे.

एलआयसीने मृत्यू दाव्यांमध्ये जास्तीत जास्त दावे मंजूर केले आहेत. दुसऱ्या बाजुला एलआयसीचे
मृत्यूचे दावे फेटाळ्याचे प्रमाण (Repudiation ratio) सुधारले आहे. एलआयसीचा दावे फेटाळ्याचे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलनेत 1% ने कमी झाले असून ते 0.6% इतके खाली आले आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण 1.6% इतेके होते.  

रखडलेले विमा दावे निकाल काढण्याचा वेग वाढला

प्रलंबित विमा दाव्यांच्या बाबतीत देखील एलआयसीने यंदा चांगली कामगिरी केली आहे. महामंडळाकडील प्रलंबित खटल्यांचे प्रमाण 1.2% इतके खाली आले आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण 1.6% इतके होते. खासगी क्षेत्रात देखील प्रलंबित विमा दावे निकाली काढण्याची प्रक्रिया चालू वर्षात वेगवान झाली आहे. चालू वर्षात प्रलंबित दावे निकाली काढण्याचे प्रमाण 0.7% इतके खाली आले आहे.