Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

CES 2023: LG टीवी दाखल, जाणून घ्या सर्व फीचर्स

CES 2023

Image Source : www.macrumors.com

CES 2023 :या वर्षीचा म्हणजे 2023 मधील सर्वात मोठा टेक इव्हेंट 5 जानेवारीपासून लास वेगासमध्ये सुरू होणार आहे. या कार्यक्रमात सर्व तंत्रज्ञान कंपन्या त्यांची उत्पादने प्रदर्शित करणार आहेत. परंतु कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच LG ने त्यांच्या 2023 OLED टीव्ही लाइनअपची झलक दाखवली आहे. LG ने Las Vegas मधील CES 2023 कार्यक्रमापूर्वी evo मालिकेत तीन टीव्ही सादर केले आहेत.

या वर्षीचा म्हणजे 2023 मधील सर्वात मोठा टेक इव्हेंट 5 जानेवारीपासून लास वेगासमध्ये सुरू होणार आहे. या कार्यक्रमात सर्व तंत्रज्ञान कंपन्या त्यांची उत्पादने प्रदर्शित करणार आहेत. परंतु कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच LG ने त्यांच्या 2023 OLED टीव्ही लाइनअपची झलक दाखवली आहे. LG ने Las Vegas मधील CES 2023 कार्यक्रमापूर्वी evo मालिकेत तीन टीव्ही सादर केले आहेत, ज्यात LG Evo Z3, G3 आणि C3 OLED यांचा समावेश आहे. हे टीव्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सादर करण्यात आले आहेत.

या टीव्हीसह डिस्प्ले, चांगले रंग आणि प्रगत आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) सपोर्टचा दावा LG करत आहे. LG च्या या TV मध्ये नवीन α9 AI Gen6 प्रोसेसर आहे. अल्फा सिरीजच्या या नवीन प्रोसेसरमध्ये AI Picture Pro आणि AI Sound Pro सारख्या AI डीप लर्निंगमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

व्हर्च्युअल 9.1.2 सराउंड साउंड CES 2023 पूर्वी लॉन्च झालेल्या या LG TV सह सपोर्टेड आहे. टीव्ही बूस्टर मॅक्स तंत्रज्ञानासह येतो. हे चांगल्या ब्राइटनेससाठी प्रकाश वाढवते आणि नियंत्रित करते. हे तंत्रज्ञान 70 टक्क्यांपर्यंत ब्राइटनेस वाढवू शकते.

एलजीने या टीव्हीबाबत पर्यावरणपूरक उत्पादनाचा दावा केला आहे. टीव्हीचे पॅकेजिंग इको फ्रेंडली मटेरियलने करण्यात आले असून सिंगल कलरचा वापर करण्यात आला आहे. LG चे हे TVs inhouse TV ऑपरेटिंग सिस्टम webOS सह सादर करण्यात आले आहेत. नवीन OS मध्ये क्विक कार्ड्स नावाचे एक नवीन फीचर आहे जे आवडत्या कंटेन्टमध्ये सहज प्रवेश करण्यास मदत करते.

कनेक्टिव्हिटीसाठी LG 2023 OLED TV मध्ये HDMI 2.1, Quick Media Switching VRR (QMS-VRR) सारखी फीचर्स  आहेत. टीव्हीचा रिफ्रेश रेट कंटेन्टनुसार बदलू शकतो. LG ने अद्याप या टीव्हीबद्दल अधिकृतपणे प्रेस रिलीज जारी केलेले नाही. परंतु, कंपनी हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर टीव्हीची फीचर्स  सार्वजनिक करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

 यात नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे इंडियन परफॉर्मिंग राइट सोसायटी लिमिटेड ही एक ना-नफा प्रकारची संस्था आहे. यामध्ये लेखक, संगीतकार आणि संगीत प्रकाशक इत्यादींचा समावेश आहे.