Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Laptop on Rent: भाड्याने लॅपटॉप घेण्याचे फायदे जाणून घ्या!

Laptop on Rent

Image Source : www.pcrenting.in

Laptop on Rent: लॅपटॉपचा नेहमी वापर होत नसेल तर त्याच्यासाठी हजारो रुपयांची गुंतवणूक कशाला करायची. त्याचा नियमित वापर केला नाही तर त्यात बिघाडसुद्धा होऊ शकतो. यासाठी लॅपटॉप भाड्याने घेतला तर त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. त्याबद्दल अधिक जाणून घेऊ.

Laptops on Rent: जे प्रोजेक्टनुसार काम करतात किंवा वर्षातून ठराविक कालावधीसाठी फक्त काम करतात किंवा जे शॉर्ट-टर्म प्रोजेक्टवर काम करतात त्यांच्यासाठी भाड्याने लॅपटॉप घेणे हा एक उत्तम पर्याय आहे.

लॅपटॉपचा नेहमी वापर होत नसेल तर त्यांच्यासाठी भाड्याने लॅपटॉप घेणे हा एक फायद्याचा निर्णय ठरू शकतो. कारण लॅपटॉपचा नेहमी वापर होत नसेल तर त्याच्यासाठी गुंतवणूक कशाला करून ठेवायची. तसेच त्याचा नियमित वापर केला गेला नाही तर त्यामध्ये बिघाड होण्याची शक्यता असते. त्यामुळे महागडा लॅपटॉप विकत घेण्याऐवजी कामापुरता भाड्याने लॅपटॉप मिळतो. या व्यतिरिक्तही भाड्याने लॅपटॉप घेण्याचे अनेक फायदे आहेत. त्याबद्दल अधिक जाणून घेऊ.

भाड्याने लॅपटॉप घेणे परवडते

महागडा लॅपटॉव विकत घेण्याऐवजी त्याचे भाडे कोणालाही परवडू शकते, या यातील महत्त्वाचा फायदा आहे. नवीन लॅपटॉप विकत घेण्यासाठी किती तरी हजार रुपये खर्च करावे लागतात. त्याऐवजी त्याच्या किती तरी कमी किमतीत लॅपटॉप भाड्याने मिळतो. यामुळे तुमचे कामही पूर्ण होते आणि त्यासाठी भरमसाठ गुंतवणूकही करावी लागत नाही.

ज्यांना लॅपटॉपवर पैसे खर्च करायचे नाहीत किंवा ज्यांना नेहमी लॅपटॉपची गरज पडत नाही. अशा लोकांसाठी लॅपटॉप भाड्याने घेणे हा फायद्याचा पर्याय ठरू शकतो. लॅपटॉप दिवसानुसार, आठवडा किंवा काही महिन्यांसाठी भाड्याने मिळतो.

हे सुद्धा वाचा: मिनी लॅपटॉप हवाय? मग किंमत, प्रोससेर, लूक जाणून घ्या   

मेन्टेनन्सचा खर्च नाही

स्वत:चा लॅपटॉप खरेदी केल्यानंतर त्याची देखभाल हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. कारण लॅपटॉपसाठी आपण हजारो रुपये खर्च करतो. त्यानुसार त्याची देखभाल सुद्धा ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा त्यामध्ये बिघाड निर्माण होऊ शकतो. जसे की, सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. लॅपटॉपमध्ये व्हायरस शिरू नये म्हणून त्यात अॅण्टी-व्हायरस टाकणे गरजेचे असते. त्यासाठी वेगळे पैसे खर्च करावे लागतात.

या सर्व भानगडी टाळण्यासाठी लॅपटॉप भाड्याने घेतल्यास त्याच्या मेन्टेनन्सची जबाबदारी आपल्यावर राहत नाही. ज्या कंपन्या किंवा संस्था भाड्याने लॅपटॉप देतात. ते लॅपटॉपच्या सुरक्षिततेची आणि मेन्टेनन्सची जबाबदारी घेतात.  

अपडेटेड टेक्नॉलॉजीचा वापर

भाड्याने लॅपटॉप घेण्याचा आणखी एक फायदा म्हणजे अपडेटेड टेक्नॉलॉजी. तुम्ही जेव्हा लॅपटॉप विकत घेता तेव्हा त्याला काही दिवस झाल्यानंतर त्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी येते. ती अपडेट करण्यासाठी पुन्हा पैसे द्यावे लागतात. त्याऐवजी भाड्याने लॅपटॉप घेताना अद्ययावत लॅपटॉपची मागणी करता येते आणि त्यासाठी वेगळे पैसेही द्यावे लागत नाही.

बऱ्याचदा प्रत्येकाची कामाची पद्धत आणि स्वरूप वेगळे असते. त्यासाठी प्रत्येकाला वेगळ्या सॉफ्टवेअरची गरज भासते. अशावेळी सर्व प्रकारची सॉफ्टवेअर विकत घेणे खर्चिक ठरू शकते. म्हणून लॅपटॉप भाड्याने घेतल्यास आपल्या गरजेनुसार सॉफ्टवेअरची मागणी करता येऊ शकते.

डिजिटल स्टोरेजची चिंता नाही

जेव्हा आपण भाड्याने लॅपटॉप घेतो. तेव्हा आपल्याला लॅपटॉपमधील स्टोरेजची चिंता नसते. आपल्याला हवा तितक्या स्टोरेजचा लॅपटॉप भाड्याने मिळतो. स्वत:चा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप असेल तर आपल्याला डिजिटल स्टोरेजची मोठी चिंता सतावते. मग ती सोडवण्यासाठी एक्सटर्नल स्टोरेज विकत घ्यावा लागतो.

लॅपटॉप भाड्याने घेताना आपल्याला खूप सारे पर्याय उपलब्ध असतात. त्यातून आपण आपल्या कामानुसार स्टोरेजची निवड करू शकतो. तसेच तो डेटा आपल्या लॅपटॉपमध्ये जपून ठेवण्यापेक्षा ऑनलाईन किंवा काम झाल्यानंतर लगेच कंपनीला किंवा क्लाईंटला पाठवून त्या जबाबदारीतून मोकळे होता येते.

हे सुद्धा वाचा: लॅपटॉप खरेदी करायला हवा की डेस्कटॉप? कुठे होईल बचत? 

फ्लेक्सिबल पेमेंट ऑप्शन

लॅपटॉप भाड्याने घेण्याचा तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे गरजेपुरते पैसे खर्च करायचे. म्हणजे लॅपटॉप विकत घेण्यासाठी भरमसाठी पैसे खर्च करण्याऐवजी किमान किमतीपासून लॅपटॉप भाड्याने मिळतात. त्याचे पेमेंट करण्याचे पर्यायसुद्धा ग्राहकांना परवडतील असे असतात. काही किमान डिपॉझिट घेऊन डेली किंवा मासिक दराने लॅपटॉप भाड्याने देतात. याचे भाडे टप्प्याटप्प्याने सुद्धा देऊ शकतो. यामुळे आर्थिक ताण येत नाही.

अशाचप्रकारे लॅपटॉप किंवा कोणतेही गॅझेट विकत घेतले की काही वर्षांनी त्याचे रुपातंर ई-कचऱ्यामध्ये होते. यामुळे वातावरणावर याचा परिणाम तर होतोच. पण काही वर्षांनी जुन्या लॅपटॉपची घरातदेखील अडचण होऊ लागते. यासाठी लॅपटॉप भाड्याने घेऊन तुम्ही निसर्गाला हातभार लावू शकता. त्याचबरोबर लॅपटॉपवर भरमसाठ पैसे खर्च केल्यानंतर त्याची किंमत काही वर्षांनी शून्यच होते. त्याची भरपाई मिळत नाही. त्यामुळे नवीन लॅपटॉपमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून शेवटी काहीच हाती येत नाही.

अशाप्रकारे जे लॅपटॉपचा नेहमी वापर करत नाही किंवा जे प्रोजेक्टनुसार काम करतात. त्यांच्यासाठी लॅपटॉप भाड्याने घेणे सोयचे ठरू शकते. शहरांमधून दिवसानुसार, आठवड्यानुसार किंवा काही महिन्यांसाठी ग्राहकांच्या मागणीनुसार लॅपटॉप भाड्याने देणाऱ्या कंपन्या आहेत.