Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Best Mini Laptop: मिनी लॅपटॉपच्या शोधात आहात? मग किंमत, प्रोससेर, लूक सर्व गोष्टींची माहिती घ्या

Best Mini Laptop

Image Source : www.shrifreevs.live

Best Mini Laptop: ज्या लॅपटॉपची स्क्रीन 14 इंचापेक्षा कमी असते, त्याला मिनी लॅपटॉप म्हणतात. लॅपटॉपचे Notebook Laptop, Altraportable Laptop, Ultrabook Laptop, Chromebook Laptop, Macbook) आणि Convertible Laptop असेही प्रकार पडतात. तर आज फक्त वेगवेगळ्या कंपनीचे मिनी लॅपटॉप, त्याचे फीचर्स आणि किमती जाणून घेणार आहोत.

Best Mini Laptop: मिनी लॅपटॉप सध्या ट्रॅव्हलिंग आणि कॅरी करण्याच्यादृष्टीने खूपच ट्रेण्ड आहेत. मिनी लॅपटॉपवर कुठेही काम करता येते. तसेच त्याचे वजन व साईज कमी असल्यामुळे त्याचा त्रासही होत नाही. तर आज आपण अशाच बेस्ट मिनी लॅपटॉपची माहिती जाणून घेणार आहोत.

मिनी लॅपटॉप म्हणजे काय?

मिनी लॅपटॉप हे प्रामुख्याने आकाराने लहान असतात. त्यामुळेच त्याला मिनी लॅपटॉप म्हटले जाते. साधारणपणे ज्या लॅपटॉपची स्क्रीन 14 इंचापेक्षा कमी असते, त्याला मिनी लॅपटॉप म्हणतात. या व्यतिरिक्त लॅपटॉपचे नोटबुक लॅपटॉप (Notebook Laptop), अल्ट्रापोर्टेबल लॅपटॉप (Altraportable Laptop), अल्ट्राबुक लॅपटॉप Ultrabook Laptop), क्रोमबुक लॅपटॉप (Chromebook Laptop), मॅकबुक (Macbook) आणि कन्व्हर्टेबल लॅपटॉप (Convertible Laptop) असेही प्रकार पडतात. तर आज फक्त मिनी लॅपटॉप, त्याच्या किमती, फीचर्स याबद्दल जाणून घेणार आहोत.

JioBook 11

जिओबुक 11 हा नुकताच आलेला आणि पूर्णपणे भारतीय ब्रॅण्डचा मिनीलॅपटॉप आहे. यामध्ये मिडिओटेक ओक्टा-कोअर प्रोसेसर असून, रॅम 4GB आणि स्टोरेज 64GB असून ती 256 जीबीपर्यंत वाढवता येते. याच्यासोबत क्लाऊड स्टोरेजसुद्धा दिले आहे. जिओने यासाठी स्वत:ची JioOS ही प्रणाली वापरली आहे. याचा डिस्प्ले 11.6 इंचाचा आहे. जिओबुकचे वजन अवघे 990 ग्रॅम असून बॅटरी लाईफ 8 तासांची आहे. याची किंमत 16,500 रुपये इतकी आहे.

Acer Travelmate Business Laptop

अॅक्सर कंपनीचा ट्रॅव्हलमेट बिझनेस लॅपटॉपमध्ये Intel Pentium N5030 Quad-core प्रोसेसर वापरण्यात आला आहे. याची स्क्रीन 11.6 इंचाची असून रॅम 4GB असून स्टोरेज 128 GB आहे. यामध्ये  Windows 11 Home हे व्हर्जन देण्यात आले आहे. मार्केटमध्ये या मिनी लॅपटॉपची किंमत 45 हजार रुपये आहे.

Lenovo IdeaPad Slim 3 Chromebook

लिनोवा कंपनीचा आयडियापॅड स्लिम 3 या क्रोमबुकमध्ये Intel Celeron N4020 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. याची रॅम 4GB असून स्टोरेज 64 GB आहे. आयडियापॅड स्लिमचे वजन 1.12 किलोग्रॅम असून त्याचा डिस्प्ले 11.6 इंचाचा आहे. यामध्ये बॅटरी बॅकअप 10 तासांचा देण्यात आला असून, क्रोम ओएस प्रणाली वापरण्यात आली आहे. मार्केटमध्ये याची किंमत 22 ते 23 हजार यादरम्यान आहे.

HP Chromebook 11a

एचपी कंपनीचा HP Chromebook 11a हा लॅपटॉप युझर्ससाठी एक वेगळा फील देणारा लॅपटॉप आहे. यामध्ये मिडिआटेक MT8183 प्रोसेसर असून रॅम 4GB आहे. याची स्क्रीनसुद्धा 11.6 इंच असून वजन 1.04 किलो आहे. या मिनी क्रोमबुकमध्ये Chrome OS ऑपरेटिंग सिस्टम वापरण्यात आली आहे. याची किंमत 21,999 रुपये इतकी आहे.

ASUS Laptop L210 Ultra Thin Laptop

असुस कंपनीचा अल्ट्रा थीन लॅपटॉप वजनाने खूपच हलका आहे. यामध्ये इंटेलचा प्रोसेसर असून, रॅम 4GB आणि स्टोरेज 64GB आहे. याचा डिस्प्ले 11.6 इंचाचा असून, यामध्ये Windows 10चा वापर करण्यात आला आहे. याची मार्केटमधील किंमत 37 ते 38 हजार रुपये आहे.

Dell Latitude 3000 3190 Netbook

डेल कंपनीचा लॅटिट्यूड 3190 हा कॉम्पॅक्ट नेटबुक असून त्याचा डिस्प्ले 11.6 इंचाचा आहे. याचा बॅटरी बॅकअप 14 तासांचा आहे. यामध्ये इंटेलचा प्रोसेसर वापरण्यात आला असून रॅम 4GB आणि स्टोरेज 128 जीबी आहे. यामध्ये Windows 10 Pro Education प्रणाली देण्यात आली आहे. याची किंमत 35 हजारांच्या आसपास आहे.