Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Landmark Cars IPO: पहिल्याच दिवशी लॅण्डमार्क कार्सचा आयपीओ 17 टक्के सब्स्क्राईब!

Landmark Cars IPO

Image Source : www.grouplandmark.in

Landmark Cars ही मर्सिडीज-बेन्झ, होंडा, जीप, फोक्सवॅगन आणि रेनॉ या कंपन्यांची डिलर कंपनी आहे. यासोबतच भारतातील अशोक ले लॅण्ड कंपनीसोबत लॅण्डमार्क कारची व्यावसायिक डीलरशीप आहे.

Landmark Cars IPO: लॅण्डमार्क कारच्या आयपीओला आजच्या पहिल्याच दिवशी हायवर्थ नेट गुंतवणूकदारांकडून (High Net-Worth Investors-HNI) आणि कंपनीतील कर्मचाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण आजच्या पहिल्या दिवशी या आयपीओला (Initial Public Offer-IPO) 17 सब्स्क्रिप्शन मिळाले आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून 552 कोटी रुपये उभारण्याचा मानस केला आहे. पण त्यापूर्वीच अँकर गुतंवणूकदारांकडून कंपनीकडे 165 कोटी रुपये जमा झाले आहेत. या आयपीओसाठी 15 डिसेंबरपर्यंत सब्स्क्राईब करता येणार आहे.

एनएसई (National Stock Exchange-NSE)कडून उपलब्ध झालेल्या माहिती अनुसार, मंगळवारी (दि.13 डिसेंबर) सायंकाळी 5 वाजेपर्यंत अंदाजे 14,04,383 इक्विटी शेअर्सची खरेदी झाली आहे. लॅण्डमार्क कार कंपनीने एकूण 80,41,805 इक्विटी शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. त्यातील पहिल्याच दिवशी 17 टक्के आयपीओ सब्स्क्राईब झाला आहे.

आयपीओची प्रति शेअर प्राईस काय आहे?

लॅण्डमार्क कार कंपनीच्या (Landmark Car Company) माहितीनुसार, अँकर गुंतवणूकदारांना (Anchor Investor) 506 रुपयांच्या भावाने 32.66 लाख शेअर्स विकले आहेत. एकूण 14 अँकर गुंतवणूकदारांनी यामध्ये गुंतवणूक केली आहे. यामध्ये एचडीएफसी म्युच्युअल फंड, निप्पॉन लाईफ इंडिया, गोल्डमॅन सॅच, आदित्य बिर्ला सनलाईफ, पाईनब्रिज ग्लोबल फंड्स, इड्लवाईज, मावेन इंडिया फंड, बीएनपी पारिबा आणि मॉर्गन स्टॅनली यांचा समावेश आहे. या आयपीओच्या प्रति शेअर्सची किंमत 481-506 निश्चित करण्यात आली आहे. 

लॅण्डमार्क कार्सने एकूण शेअर्समधून 14.22 लाख शेअर्स 4 डोमॅस्टिक म्युच्युअल फंड हाऊसला 4 वेगवेगळ्या योजनांतर्गत देण्यात आले आहेत. कंपनी आयपीओच्या माध्यमातून 552 कोटी रुपयांचा इश्यू आणत आहे. यामध्ये 150 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू आणि 402 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल (Offer for Sale-OFS) साठी उपलब्ध आहेत. कंपनीचे प्रमोटर्स आणि प्रायव्हेट इक्विटी TPG Growth आपला हिस्सा विकत आहे. तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक इश्यू 48 रुपयांच्या सवलतीसह मिळत आहे.


Landmark Cars मध्ये गुंतवणूक करावी की नाही?

शेअर मार्केटमधील तज्ज्ञांच्या अनुसार, जे गुंतवणूकदार दीर्घकालीन काळासाठी गुंतवणूक करू शकतात. त्यांना यामध्ये गुंतवणूक करण्यास हरकत नाही. कंपनी नवीन स्टोअर्स सुरू करत आहे. यासोबतच कंपनीच्या विक्रीचे आकडेही वाढत आहेत. ज्याचा फायदा भविष्यात ग्राहकांना होऊ शकतो. कंपनीचा सध्याचा फोकस हा प्रीमिअम आणि लक्झरी ऑटोमोटीव्ह सेगमेंटवर आहे. लॅण्डमार्क कार्सच्या शेअर्सचे अलॉटमेंट 20 डिसेंबरला फायनल होईल आणि त्यानंतर 23 डिसेंबरला याचे लिस्टिंग होऊ शकते.

Landmark Carsची आर्थिक स्थिती कशी आहे?

कंपनीला 2021-22 मध्ये 52 टक्के नफा झाला असून त्यातून कंपनीला 2989 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. त्यात कंपनीचा नेट प्रॉपिट याच कालावधीत 6 टक्क्यांनी वाढून 66 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जून 2022च्या तिमाहीत कंपनीला 802 कोटी रुपयांचा महसूल आणि 18 कोटी रुपयांचा नफा झाला आहे.

(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स, आयपीओ खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)