सुरक्षित आणि जोखीम न घेता गुंतवणूक करणाऱ्यांसाठी कोटक महिंद्रा बँकेने आनंदाची बातमी दिली आहे. 2 कोटींपेक्षा कमी किंमतीच्या मुदत ठेवींवर (Kotak Mahindra bank rate hike) व्याजदर बँकेने वाढवले आहेत. एकाच महिन्यात सलग दुसऱ्यांदा बँकने मुदत ठेवींचे व्याजदर वाढवले आहेत. रिझर्व्ह बँकेने व्याजाच्या दरात वाढ करण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक बँकांनी FD वरील व्याजाच्या दरात बदल केले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना कोटक महिंद्रा बँकेतील FD गुंतवणुकीतून जास्तीत जास्त 7.70% दराने व्याज मिळू शकतो.
नवे दर आजपासून (17 फेब्रुवारी) पासून लागू होणार आहेत, अशी माहिती कंपनीने आपल्या संकेतस्थळावर दिली आहे. या आधी 10 फेब्रुवारीला कंपनीने दरवाढ केली होती.
काय आहेत नवे व्याजदर (Kotak Mahindra Bank FD rates)
आता ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर जास्तीत जास्त 7.7 टक्के व्याजदर मिळू शकतो. तर सर्वसामान्य नागरिकांना 7.20% व्याजदर मिळेल. 15 महिने ते 2 वर्ष कालावधीपर्यंत गुंतवणूक केल्यास या दराचा लाभ घेता येईल. हे नवे दर स्थानिक, NRO (Non-Resident Ordinary) आणि NRE (Non-Residential External) नागरिकांसाठी असतील. तसेच वेळेच्या आधी गुंतवणूक काढून घेण्याची सुविधाही याअंतर्गत उपलब्ध आहे.
गुंतवणुकीचा कालावधी | सर्वसामान्य नागरिक | ज्येष्ठ नागरिक |
390 दिवस (12 महिने 25 दिवस) | 7.20% | 7.70% |
391 दिवस - 23 महिन्यांपेक्षा कमी | 7.20% | 7.70% |
23 महिने | 7.20% | 7.70% |
23 महिने 1 दिवस- 2 वर्षांपेक्षा कमी | 7.20% | 7.70% |
2 वर्ष- 3 वर्षांपेक्षा कमी | 6.75% | 7.25% |
3 वर्षांपेक्षा जास्त मात्र 4 वर्षांपेक्षा कमी | 6.50% | 7.00% |
4 वर्षांपेक्षा जास्त मात्र 5 वर्षांपेक्षा कमी | 6.25% | 6.75% |
5 वर्षांपेक्षा जास्त मात्र 10 वर्षांपेक्षा कमी | 6.20% | 6.70% |
कोटक महिंद्रा आवर्ती ठेव व्याजदर (Kotak Mahindra Bank recurring deposit rates)
बँकेने आवर्ती ठेवींवरील व्याजदरातही वाढ केली आहे. नव्या दरानुसार, सर्वसामान्य नागरिकांना 6 ते 7.20% पर्यंत व्याजदर मिळू शकतो. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.50 ते 7.70% व्याजदर मिळू शकतो. 15, 18 आणि 21 महिन्यांच्या गुंतवणुकीवर सर्वाधिक 7.20% आणि 7.70% व्याजदर मिळू शकतो.
आवर्ती ठेवींचा हप्ता भरण्यास उशीर झाल्यास दंड किती?
आवर्ती ठेवीचा हप्ता भरण्यास 5 दिवसांच्या ग्रेस पिरियड (अतिरिक्त मुदत कालावधी) नंतर विलंब झाला तर RD व्याजदर + 2% p. a यावर दंडाची रक्कम आकारली जाईल. तसेच बँकेने वेळोवेळी बदललेल्या व्याजदरानुसार दंडाची रक्कम आकारला जाईल, असे बँकेने आपल्या संकेतस्थळावर म्हटले आहे.