कोटक म्युच्युअल फंडांकडून मिडकॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या कोटक इमर्जिंग इक्विटी फंडाने मागील काही वर्षात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. खासकरुन मागील पाच वर्षात या फंडाने बेंचमार्क निफ्टी 150 च्या तुलनेत गुंतवणूकदारांना सरस परतावा दिला.
(Kotak Emerging Equity Fund)
कोटक इमर्जिंग इक्विटी फंड 2007 मध्ये सुरु झाला होता. या फंडाची स्ट्रॅटेजी म्हणजे मध्यम आकारमान असलेल्या चांगल्या कंपन्यांना हेरुन त्यात गुंतवणूक केली जाते. शेअर मार्केटमध्ये 2019 आणि 2020 मध्ये घसरण झाली होती, मात्र या पडझडीत देखील कोटक इमर्जिंग इक्विटी फंडाने चांगली कामगिरी केली होती.
कोटक इमर्जिंग इक्विटी फंडाच्या कामगिरीचा आढावा घेतला तर मागील पाच वर्षात या फंडाने गुंतवणूकदारांना दरवर्षी सरासरी 19% रिटर्न दिला आहे. याच कालावधीत या योजनेचा बेंचमार्क असलेल्या निफ्टी मिडकॅप 150 ने सरासरी 16.9% रिटर्न दिला.
कोटक इमर्जिंग इक्विटी फंडात पाच वर्षांपूर्वी 10000 रुपयांची गुंतवणूक केली असती तर आजच्या घडीला हे मूल्य 23827 रुपये इतके वाढले असते. एका वर्षात कोटक इमर्जिंग इक्विटी फंडाने 19.42% परतावा दिला आहे. 2 वर्षात 16.41% आणि 3 वर्ष कालावधीत 31.15% रिटर्न दिला आहे.
5 वर्ष या फंडांत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 19.03% रिटर्न मिळाले. 7 वर्षांच्या कालावधीत या फंडाने 17.87% रिटर्न दिला. या योजनेने सुरुवातीपासून सरासरी 17.64% परतावा देण्याचे सातत्य राखले आहे.
(डिसक्लेमर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्सच्या खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)