Emergency Movie Release Date: बाॅलिवुडची अभिनेत्री कंगना रनौत हिने बाॅलिवुडला नेहमीच चांगले चित्रपट दिले आहे. तिचा चाहता वर्गदेखील मोठा आहे. ती नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. तसेच तिच्या या बिनधास्त स्वभावामुळे तिला कधी फटकादेखील बसला आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे बंद केलेले ट्विटर अकाउंट पुन्हा सुरूदेखील करण्यात आले आहेत. आता ती तिच्या गहाण ठेवलेल्या संपत्तीमुळे चर्चेत आली आहे.
कंगना रनौतने का ठेवले घर गहाण (Why did Kangana Ranaut take a House Mortgage)
कंगना रनौतने बाॅलिवुडला क्वीन (Queen), क्रिश 3 (Krrish 3), तन्नू वेडस् मन्नू (Tanu Weds Manu), फॅशन (Fashion), पंगा (Panga) असे एक ना एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तसेच तिने स्वत: देखील काही चित्रपटांची निर्मिती केली आहे. यामध्ये मणिकर्णिका (Manikarnika) व थलाइवी (Thalaivi) चित्रपटांचा समावेश आहे. आता कंगना रनौत एक नवीन चित्रपट घेऊन येण्याच्या तयारीत आहे, ज्याचे नाव आहे ‘इमरजेंसी’ (Emergency Movie). या चित्रपटामुळे तिने तिचे आलिशान घर गहाण ठेवले असल्याचा खुलासा तिने स्वत:ने सोशल मिडीयावर केला आहे.
इमरजेंसी चित्रपट कशावर आधारित आहे?(What is the Movie Emergency Based on)
कंगना रनौतचा नवीन चित्रपट येण्याच्या तयारीत आहे. तिच्या या चित्रपटाचे नाव इमरजेंसी असे आहे. हा चित्रपट एक बायोपिक असून तो इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित आहे. यामध्ये बाॅलिवुड क्वीन कंगना रनौत ही ‘इंदिरा गांधी’ (Indira Gandhi) यांच्या भुमिकेत पाहायला मिळणार आहे. सध्या ती याच चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त असल्याचे सांगितले जात आहे. तसेच तिने या चित्रपटाची निर्मिती केली असल्याने घर गहाण ठेवले असल्याचा खुलासादेखील केला आहे. हा चित्रपट 14 जुलै 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अनुपम खेर, महिमा चौधरी, मिलिंद सोमण, सतीश कौशिक व श्रेयश तळपदे हे कलाकार झळकणार आहे.