Pathan Movie Tickets Price: शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट पठाण (Pathan) रिलीज होण्यापूर्वीच तुफान कमाई करीत आहे. चित्रपट प्रदर्शनाला आणखी दोन दिवस बाकी आहेत, मात्र तरी ही चित्रपटाच्या अॅडव्हाॅन्स बुकिंगने वेग वाढविला आहे. प्रेक्षक किंग शाहरूख खानला (Shah Rukh Khan) चार वर्षाने पुन्हा पडदयावर पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे.
महागडया तिकिटांना ही मागणी (This Demand for Expensive Tickets)
बाॅलिवुड बादशाह शाहरूख खानला पुन्हा मोठया पडदयावर पाहण्यासाठी प्रेक्षक उतावीळ झाले असल्याचे दिसत आहे. त्याचे चाहते पैशांची परवा न करता बिनधास्तपणे हजारो रूपयांचे तिकिट खरेदी करत आहेत. 20 जानेवारी या चित्रपटाची अॅडव्हाॅन्स बुकिंग सुरू झाली, त्यावेळी तिकिटचे दर हे गगनाला भिडत होते. मात्र तरी ही प्रेक्षक तिकिट खरेदी करण्यास कोणतीही कसर सोडत नसल्याचे दिसत आहे. गुरूग्राम येथील एंबियांस माॅलमध्ये पठाणच्या तिकिटांची विक्री ही 2000 रूपयांपासून ते 2400 रूपयांपर्यत होत आहे. तरी ही येथील शो चे अॅडव्हाॅन्स बुकिंग हाऊसफुल होत आहे.
Rs. 2400 for a ticket ?
— Arun Bothra ?? (@arunbothra) January 22, 2023
Reminded me of cinema hall at my native place in Rajasthan. Box ticket was Rs. 5. Third class with Rs. 1.30. Total collection of a show must have been less than the price of a #Pathan ticket in Gurgaon.
Of course that was some four decades ago. pic.twitter.com/edntWBWEos
दिल्लीत तिकिटाचे दर सर्वात जास्त (Ticket Prices are Highest in Delhi)
दिल्ली येथील काही मल्टीप्लेक्समध्ये पठाण चित्रपटाच्या तिकिटांची विक्री ही 2100 रूपयांपर्यंत होत आहे. विशेष म्हणजे सकाळी असणाऱ्या स्वस्तातील शो चे तिकिटांची विक्रीदेखील 1000 रूपयात होत असल्याचे पाहायला मिळत आहे. असे चित्र पाहता, हा चित्रपट लवकरच सर्व चित्रपटाचे रेकाॅर्ड मोडेल हे नक्की. या चित्रपटाची बुकिंग अॅडव्हाॅन्स पाहता, पहिल्याच दिवशी 50 करोडोंचा टप्पा पार पाडेल असे सांगितले जात आहे. या चित्रपट अनेक वादग्रस्त परिस्थितीत अडकला असला, तरी याचा परिणाम त्याच्या तिकिट विक्रीवर झालेला दिसत नाही.