Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pathan Movie: शाहरूख खानचा पठाण चित्रपट पहिल्याच दिवशी अॅडव्हान्स बुकिंगव्दारे 50 करोड कमविण्याच्या तयारीत

Pathan will Earn 50 crores on the First Day

Image Source : http://www.india.com/

Sharukh Khan: शाहरूख खानचा पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच 50 करोड गल्ला जमविणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, याविषयी अधिक जाणून घेवुयात

Pathan will Earn 50 crores on the First Day: पठाण या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच देशात धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाच्या गाण्यांपासून ते ट्रेलरपर्यंत रोज ना रोज, काही ना काही बातम्यांनी हा चित्रपट चर्चेत आहे. एवढेच नाही, तर हा चित्रपट वादग्रस्त परिस्थितीत अडकला तरी या चित्रपटाचे शो हाऊसफुल्लमध्ये बुकिंग होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आता तर या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच अॅडव्हान्स बुकिंगव्दारे 50 करोडची कमाई करण्यात लवकरच यशस्वी होणार असल्याचे सांगितले जात आहे.

पठाण मोडणार  रेकॉर्ड? (Pathan will Break the Record)

बाॅलिवुड बादशहा (Bollywood Badshah) शाहरूख खान (Shahrukh Khan) हा पठाण (Pathan) चित्रपटाव्दारे तब्बल चार वर्षाने कमबॅक करत आहे. मात्र त्याच्या या चित्रपटाची तुफान चर्चा होत आहे. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी सकाळी 6 वाजता थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. पठाण चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगद्वारे एकापेक्षा एक सुपरहीट चित्रपटाचे रेकॉर्ड मोडणार आहे. जसे की, ठग्स ऑफ हिंदोस्तान या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 15 कोटींहून अधिक कमाई केली होती. आता पठाण हा चित्रपट याचा रेकॉर्ड मोडून चांगली ओपनिंग करेल असे सांगण्यात येत आहे. बाॅलिवुडमध्ये आतापर्यंत तीन चित्रपटांनी पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 44 कोटी ते 51 कोटीं रूपयांचा बिझनेस केला होता. आता या गुड ओपनिंगच्या लिस्टमध्ये पठाणचा देखील समावेश होणार का, हे पाहण्याची उत्सुकता आहे. 

पठाणसाठी थिएटर हाऊसफुल्ल (Theater Housefull for Pathan)

शाहरूख खानच्या जबरा फॅनचे थिएटर बुक असो किंवा महागडी तिकिटांची अॅडव्हान्स बुकिंग असो हे चित्र पाहता, हा चित्रपट लवकरच 50 करोडचा टप्पा पार करेल असे दिसत आहे. हा चित्रपट मल्टिप्लेक्स तसेच सिंगल स्क्रीन थिएटरमध्येदेखील प्रदर्शित होणार आहे. तसेच प्रेक्षकांचा उत्साहदेखील जोरदार दिसत आहे. सोबतच महागडी तिकिटेदेखील प्रेक्षक खरेदी करताना पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांचा हा उत्साह पाहता हा चित्रपट नक्कीच 50 कोटी गाठणार हे नक्की.