Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Worlds Expensive Water: जाणून घ्या, जगातील सर्वाधिक किंमतीची पाण्याची बॉटल कोणती आहे?

Worlds Expensive Water

Image Source : http://www.luxe.digital.com/

World's Expensive Water Bottle: आपण घरबसल्या पाणी पितो तसेच बाहेर कुठे असेल तर बिसलेरी बॉटल विकत घेतो. या पलिकडे आपल्याला पाण्याविषयी जास्त काय माहित नसते. फक्त 10 किंवा 20 रूपयांची पाण्याची बॉटल आपण सहज घेतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का, जगात सर्वाधिक महाग म्हणजेच सर्वाधिक किंमतीची पाण्याची बॉटल कोणती?

What is The Worlds Most Expensive Water Bottle Prize: शक्यतो, आपण भारतीय संघाचे खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) इतक्या महागडया बाटलीतील पाणी पितो तर रोहित शर्मा (Rohit Sharma) या किंमतीच्या बाटलीतील पाणी पितो अशा अनेक बातम्या आपल्या कानावर पडल्या आहेत. पण जगातील सर्वाधिक महागडया पाण्याच्या बॉटलची काय किंमत आहे माहिती का?

जगातील सर्वाधिक किंमतीची बॉटल (Worlds Expensive Water)

तुम्हाला माहिती का ‘ॲक्वा डी क्रिस्टलो ट्रिब्यूटो ए मोदिग्लिआनी’ (Acqua di Cristallo Tributo a Modigliani) ही जगातील सर्वाधिक किंमतीची पाण्याची बॉटल आहे. या ब्रॅण्डच्या अनेक किंमतीच्या बाटल्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या ब्रॅण्डच्या सर्वात कमी किंमतीच्या बॉटलची किंमत साधारणपणे  21, 355 रूपये इतकी आहे. तर याच्या 750 मिलीटर पाण्याची किंमत सुमारे 45 लाख रूपये इतकी आहे. हे पाणी भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबातील सदस्य  नीता अंबानी पितात असे सांगितले जाते. कारण हे पाणी शरारीसाठी अतिशय फायदेशीर असून हे पाणी इतर पाण्यासारखेच आहे.  

महागडया पाण्याची खासियत (Expensive Water Speciality)

मिडीया रिपोर्टनुसार, ॲक्वा डी क्रिस्टलो ट्रिब्यूटो ए मोदिग्लिआनीच्या पाण्यामध्ये 5 ग्रॅम सोन्याचे भस्म मिसळले असते. हे सोनं शरीरासाठी चांगले असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या पाण्याची बॉटल सोन्यापासून तयार केलेली असून याचे पॅकेजिंग लेदरने बनविले आहे. Fernando Altamirano यांनी या बॉटलचे डिझाइन केले आहे. विशेष म्हणजे, हे पाणी  ‘फ्रान्स’ (France) व ‘फिजी’ (Fiji) या देशांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. 2010  गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये सर्वात महागड पाणी म्हणून ‘ॲक्वा डी क्रिस्टलो ट्रिब्यूटो ए मोदिग्लिआनी ’या बॉटलची नोंद करण्यात आली आहे