Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Flower Farming Subsidy Scheme: माहित करून घ्या, काय आहे फूल शेती अनुदान योजना?

Flower Farming Subsidy Scheme

Flower Farming Subsidy Scheme: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यात शेतकऱ्यांना सलग शेतात फुल पिकाच्या लागवडीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Flower Farming Subsidy Scheme: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून  राज्यात शेतकऱ्यांना सलग शेतात फुल पिकाच्या लागवडीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गुलाब, मोगरा, निशिगंधा या फुलांची लागवड करण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी विभागाने1 ऑक्टोंबर 2020  रोजी एक पत्रक काढून राज्यात फुल पिकांची (flower farming) लागवड करण्यासाठी मंजूरी दिली. 

लाभार्थी आणि पात्रता (Beneficiaries and Eligibility)

  • अनुसूचित जाती
  • अनुसूचित जमाती
  • भटक्या जमाती
  • भटक्या विमुक्त जमाती
  • दारिद्र्य रेषेखालील इतर कुटुंबे
  • महिला प्रधान कुटुंबे
  • शारिरीक अपंगत्व प्रधान असलली कुटुंबे

आवश्यक कागदपत्रे (Documents)

  • प्रपत्र  _ अ  मधील अर्ज 
  • प्रपत्र – ब प्रमाणे संमतीपत्र
  • अर्जदाराचे जमिनीचे ( 7/12 )  (8 A)
  • दारिद्र्य रेषेखालील असल्यास दाखला
  • अर्जदार जात प्रवर्गातील असल्यास जातीचा दाखला किंवा तीचा उल्लेख असलेली कोणतेही अधिकृत शासनाचे पुरावे.

फूल शेती अनुदान योजनेसाठी अर्ज कुठे करावा? (Where to apply for Flower Farming Subsidy Scheme?)

शेतकऱ्याने ग्रामपंचायत या योजनेचा आरज करावा. अर्ज केल्यानंतर लाभार्थीची निवड ग्रामसभेच्या वतीने केली जाते. पुढे ग्रामपंचायतीच्या म्हणण्यानुसार  कृषी विभागास हा अर्ज सादर  केला जातो. यासाठी दरवर्षी एप्रिल महिन्याच्या अखेर ग्रामसभा  घेणे आवश्यक आहे.

लागवडी साठी कलमे, रोपे कोठून खरेदी करावीत? (Where to buy cuttings, seedlings for planting?)

  • कृषी विभागाच्या रोपवाटीका
  • खाजगी शासन मान्य रोपवाटिका
  • सामाजिक वनीकरण विभाग किंवा अन्य शासकीय विभागाच्या रोपवाटिका
  • कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिकाकलमे/रोपे खरेदी व वाहतुक लाभार्थी यांनी स्वत: करायची आहे. 

लागवड कालावधी किती असावा? आणि अनुदान (How long should the planting period be? and grants)

या योजनेअंतर्गत फुल शेतीचा  लागवड कालावधी हा 1 जुन ते 30 नोव्हेंबर असा असावा. फुल शेती लागवड अनुदान (Flower Farming Subsidy Scheme) योजनेच्या माध्यमातून निशीगंध, गुलाब आणि मोगरा या फुलपिकांच्या लागवडी साठी प्रती हेक्टर 2 लाख इतके अनुदान मिळते. ते मजुरी आणि सामग्रीसाठी असते. हे सर्व अनुदान मिळेल 1 वर्षाचा कालावधी लागतो. फूल शेतीसाठी झालेला खर्च आणि त्याच्या पावत्या दिल्यानंतर तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या खात्यात रक्कम जमा होते.