Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ved Movie Box-office collection: जाणून घ्या, 'वेड' चित्रपटाची रेकॉर्डब्रेक कमाई; सैराटला ही टाकले मागेल

Ved Movie Box-office Collection

Ved Marathi Movie: रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ हा चित्रपट 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून ते दहाव्या दिवसांपर्यंत थिएटर अजून ही हाउसफुल होत आहे. सैराटनंतर महाराष्ट्रातील प्रेक्षकांना या चित्रपटाने वेड करून सोडले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने सैराटला ही मागे टाकले आहे. पाहूयात, या चित्रपटाची बॉक्स ऑफिस वरील कमाई

Ved Movie: रितेश देशमुख (Riteish Deshmukh) व जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांची मुख्य भूमिका असलेला ‘वेड’(Ved Movie) या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. या चित्रपटाची दहाव्या दिवशीही घौडदौड सुरू आहे. तसेच या चित्रपटातील ‘मला वेड लागलयं’ गाण्यानेदेखील सोशलमिडीयावर धुमाकूळ घेतला आहे. इंस्टाग्रामवर तर ‘वेड’ चित्रपटातील गाण्यांवर रील्स मोठया प्रमाणात दिसत आहे.  प्रेक्षकांना वेड लावून ठेवणाऱ्या या चित्रपटाने किती कमाई केली, याबाबत जाणून घेऊयात.

बॉक्स ऑफिसवर कमाई (Box office Earnings)

‘वेड’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 2 कोटी 25 लाख रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर पहिल्या आठवड्यात 20.67 कोटीं रूपये कमविले. आता तर या चित्रपट प्रदर्शनाच्या दहाव्या दिवशीही ‘वेड’ या चित्रपटाचा बोलबाला आहे. दहाव्या दिवशी तर या चित्रपटाने तब्बल 5.70 कोटींचा गल्ला जमा करत, बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत ‘वेड’ने सैराट चित्रपटालाही मागे टाकले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत एकाच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा पहिलाच चित्रपट ठरला आहे.

Ved Box-office
http://www.ndtv.com/

रितेश भावूक (Ritesh Emotional)

वेड या चित्रपटाचा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता, रितेशदेखील भावूक झाला आहे. आपली भावना त्याने सोशलमिडीयावर एका पोस्टच्या माध्यमातून शेयर केली आहे. त्या पोस्टमध्ये रितेश म्हणाला, “प्रेक्षकांचे कोटी कोटी आभार...वेड चित्रपटावर आपले प्रेम व आशिर्वाद असाच लाभू द्या”, विशेष म्हणजे रितेशने दिग्दर्शन केलेला हा पहिलाच हा चित्रपट आहे.

या चित्रपटातील कलाकार (Actors in the Film)

वेड चित्रपटात रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, जिया शंकर, अशोक सराफ, शुभंकर तावडे या कलाकारांचा समावेश आहे. या चित्रपटाची पटकथा ऋषिकेश तुराई व संदीप पाटील, संवाद प्राजक्त देशमुख, संकलन चंदन अरोरा व छायाचित्रण भूषणकुमार जैन यांनी केले आहे. या कलाकारांच्या मेहनतीने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हीट ठरत आहे. पुढे ही हा चित्रपट किती कमाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

Ved Cast (1)