Today's Gold Silver Rates: भारतीय सराफा बाजारात आज 21 डिसेंबर रोजी सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे आणि त्याचबरोबर चांदीच्या दरात सुद्धा 500 रुपयापेक्षा जास्त वाढ दिसून येत आहे. सोन्याचा भाव अजूनही 54 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत 66 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 54,704 रुपये आहे. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 66444 रुपये आहे. शुद्धतेनुसार आजचे सोन्याचे दर जाणून घेऊया.
Table of contents [Show]
199 रुपयांनी सोने वाढले
अधिकृत वेबसाइटनुसार, 995 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत काल सायंकाळी 54287 होती तर आज दुपारी 3 वाजता 54,485 रुपये झाली आहे. त्याचवेळी 916 शुद्धतेचे सोने आज 50109 रुपये झाले आहे. 750 शुद्धतेच्या सोन्याचा भाव 41028 रुपयांवर पोहोचला आहे. त्याचवेळी 585 शुद्धता असलेले सोने महाग होऊन आज 32002 रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच आज सोन्याच्या दरात 199 रुपयांनी वाढ झाली आहे.
622 रुपयांनी महागली चांदी
काल सायंकाळी 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचा दर 67849 रुपये होता. आज दुपारी 3 वाजता 622 रुपयांनी वाढून 68771 रुपये झाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड तेजी
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. चांदीच्या दरात 4 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कालच्या बंद किमतीच्या तुलनेत सोन्याची स्पॉट किंमत 1.56 टक्क्यांनी वाढून $1,815.13 प्रति औंस झाली आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत 4.44 टक्क्यांनी वाढली आणि 24 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. अलीकडच्या काळातील चांदीच्या किमतीत झालेली ही सर्वात वेगवान झेप आहे.
आजचे सोन्या चांदीचे दर (Today's gold and silver rates)
सोने /चांदी | शुद्धता | किंमत |
सोने | 999 | 54704 |
सोने | 995 | 54485 |
सोने | 916 | 50109 |
सोने | 750 | 41028 |
सोने | 585 | 32002 |
चांदी | 999 | 68471 |