भारतीय सराफा बाजारात गुरुवारी (10 नोव्हेंबर) सोन्याच्या किमतीत वाढ झाली, तर चांदीच्या किमतीत घट झाल्याचे दिसून आले. सोनं आणि चांदीच्या लेटेस्ट रेटवर (Gold & Silver Latest Rate) नजर टाकली तर 999 शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याचा भाव 51 हजारांच्या पुढे गेला तर 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचा भाव 61 हजारांच्या पुढे गेला आहे. गुरूवारी दुपारी चार वाजता 999 शुद्धतेच्या (24 कॅरेट) दहा ग्रॅम सोन्याची किंमत 51,619 वर पोहोचली आणि 995 शुद्धतेच्या (22 कॅरेट) दहा ग्रॅम सोन्याची किंमत 51412 वर गेली, 916 शुद्धतेचे सोनं आज 47,283 रुपये झाले आहे. त्यासोबतच 750 शुद्धतेच्या सोन्याचा भाव 38,714 रुपये झाला आहे आणि 585 शुद्धतेचे सोने आज 30197 रुपयांनी महागले आहे. तर 999 शुद्धतेची एक किलो चांदी आज थोडीशी घसरून 61,248 रुपयांवर आली आहे.
सोन्या-चांदीच्या किमतीत काय बदल?
दिवसभरात सोन्या-चांदीच्या किमतीत बदल होत असल्याचे दिसून येते. दुपारच्या ताज्या अपडेटनुसार, 999 शुद्धतेचे 10 ग्रॅम सोनं आज 105 रुपयांनी महागले आणि 995 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 104 रुपयांनी वाढली. त्याचबरोबर 916 शुद्धतेचं सोनं 96 रुपयांनी, 750 शुद्धतेचं सोनं 78 रुपयांनी आणि 585 शुद्धतेचं सोनं 61 रुपयांनी महागले आहे. दुसरीकडे, एक किलो चांदी आज 302 रुपयांनी स्वस्त झाली आहे. नवीन अपडेटसाठी इथे क्लिक करा.
सोनं - चांदी | शुद्धता | आजचे दर | कालचे दर |
सोनं | 999 | 51619 | 51514 |
सोनं | 995 | 51412 | 51308 |
सोनं | 916 | 47283 | 47187 |
सोनं | 750 | 38714 | 38636 |
सोनं | 585 | 30197 | 30136 |
चांदी | 999 | 61248 | 61550 |
24 कॅरेट सोनं कोणतं?
24 कॅरेट सोन्याला सर्वात शुद्ध सोने म्हटले जाते. त्यात इतर कोणत्याही धातूची भेसळ केली जात नाही. त्यालाचा 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हटले जाते. 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.67 टक्के शुद्ध सोने आहे. उर्वरितमध्ये 8.33 टक्के इतर धातूंचा समावेश आहे. 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं आहे. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं आणि 14 कॅरेट सोन्यामध्ये 58.5 टक्के शुद्ध सोनं असते.