Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Best Investments For Millennials: तरुणाईसाठी गुंतवणुकीचे निवडक मार्ग

Best Investments For Millenials

Best Investments For Millennials: गुंतवणुकीसाठी आज बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. भविष्यातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी कमी वयात तरुणांनी गुंतवणुकीची सवय लावायला हवी.

Best Investments For Millennials  And Gen Z In India :  गुंतवणुकीचे अनेक पर्याय आज बाजारात उपलब्ध आहेत. जोखीम घेण्याची तुमची क्षमता  किती आहे, सुरक्षित परतावा तुम्हाला महत्वाचा वाटतो का, यानुसार अनेक  पर्याय उपलब्ध  आहेत. भविष्यातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी कमी वयात तरुणांनी गुंतवणुकीची सवय लावायला हवी. Millennials आणि Gen Z  साठी गुंतवणुकीचे कोणते पर्याय आहेत ते बघूया.

स्टॉक्समधील गुंतवणूक (Investment in Stocks)

शेअर्समधील गुंतवणूक ह लोकप्रिय झालेला पर्याय आहे. शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक दीर्घकाळात चांगला परतावा देते. रिटर्न मिळण्याच्या दृष्टीने हा एक चांगला पर्याय मानला जातो. मात्र यात जोखीम देखील असते. यामुळे तुमची जोखीम घेण्याची क्षमता किती आहे, ते पाहणे यात गुंतवणूक करताना महत्वाचे असते. शिवाय शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी शेअर मार्केटचा अभ्यास करणेदेखील गरजेचे  असते.

म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक (Investment in Mutual Fund)

ज्यांना बाजाराचा सखोल अभ्यास करण्यासाठी वेळ किवा इच्छा नाही त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड हा एक पर्याय ठरतो. म्युच्युअल फंडामध्ये देखील चांगले रिटर्न देण्याची क्षमता असते. जोखीम घेण्याची क्षमता किती आहे, यानुसार वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात.  

क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक (Investment in Cryptocurrency)

तरुणांमध्ये क्रिप्टोकरन्सीत देखील गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. डिजिटायझेशनमुळे व्यवहार सुलभ झाले आहेत. यात गुंतवणूक करताना विशेष सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असल्याचा सल्ला दिला जातो.  किमतीमधील चढ-उतार मोठ्या प्रमाणात होत असतात. तरुणांमध्ये Bitcoin आणि Ethereum सारख्या क्रिप्टोकरन्सीमधून गुंतवणूक करून दीर्घ कालावधीत नफा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.

सोन्यातील गुंतवणूक (Investment in Gold)

गुंतवणूक करत असताना त्यात सुरक्षितता देखील महत्वाची ठरते. यादृष्टीने सोने हा देखील एक गुंतवणूकीचा पर्याय म्हणून समोर येताना दिसतो. पारंपरिक पद्धतीने सोने खरेदी करताना त्यात सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा ठरतो. यामुळे ऑनलाइन पद्धतीने यात गुंतवणूक करण्याचा कल वाढताना दिसतो. यामुळे सोन्यातील गुंतवणूक लुटमारीच्या धोक्यापासून मुक्त होते.

‘पीपीएफ’मधील गुंतवणूक (Investment in PPF)

पब्लिक प्रॉव्हीडंट फंड (PPF) मध्ये देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. 15 वर्षाच्या लॉकइन कालावधीमध्ये चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळवण्याची संधी ही योजना देते. टॅक्स बेनिफीटमुळे देखील हा पर्याय आकर्षक ठरतो.

मुदत ठेवीमधील गुंतवणूक (Investment in fix Deposit)

मुदत ठेव हा देखील एक पारंपरिक मार्ग आहे. इक्विटी म्युच्युअल फंड किवा स्टॉक्सच्या तुलनेत यात सुरक्षित परतावा मिळतो. यामुळे मुदत ठेवीमध्ये (फिक्स डीपॉझिट) गुंतवणूक करणारा एक मोठा वर्ग आहे. यातले रिटर्न्स तितके आकर्षित करत नाहीत मात्र जे सुरक्षिततेला प्राधान्य देतात, अशा गुंतवणूकदारांची एफडीला पसंती असते. गुंतवणूकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. आपली आर्थिक उद्दिष्टे काय आहेत आणि आपली रिस्क घेण्याची क्षमता काय आहे, ही बाब यादृष्टीने महत्वाची ठरते.  या  सगळ्याचा सारासार विचार करून निर्णय घेणे योग्य ठरते.