Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PPF Rules: एनआरआयसाठी पीपीएफचे नियम काय आहेत? मॅच्युरिटीच्या रक्कमेवर कर भरावा लागतो का? जाणून घ्या

PPF Rule

Image Source : https://www.freepik.com/

परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना पीपीएफ खाते उघडण्याची परवानगी नसली तरीही आधीपासून असलेल्या खात्यात ते रक्कम जमा करू शकतात. पीपीएफ खात्यातून काढलेली रक्कम त्यांच्या एनआरओ खात्यात जमा होते.

अनेकजण भविष्यातील आर्थिक उद्देशांसाठी व गुंतवणुकीच्या दृष्टीने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजनेला प्राधान्य देतात. दीर्घकालीन उद्देशाच्या दृष्टीने पीपीएफमधील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. ही सरकारी योजना असल्याने यात नुकसान होण्याची शक्यता देखील असते. पीपीएफमध्ये गुंतवलेली रक्कम व यावर मिळणारे व्याज हे करपात्र नसते. 

भारतात राहणाऱ्यांना तर पीपीएफच्या नियमांबद्दल माहिती असते. परंतु, देशसोडून परदेशात राहत असलेल्या अनिवासी भारतीयांसाठी (NRI) पीपीएफचे नियम काय आहेत व मुदतीनंतरच्या रक्कमेवर कर भरावा लागतो का? याबाबत संपूर्ण माहिती नसते. त्यामुळे एनआरआयसाठी पीपीएफचे नियम काय आहेत, ते जाणून घेणे गरजेचे आहे. 

एनआरआयसाठींच्या नियमांमध्ये काही वर्षांपूर्वी बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार एनआरआय व्यक्तीला पीपीएफ खाते उघडण्यासाठी परवानगी नाही. पीपीएफमध्ये गुंतवलेल्या रक्कमेवर करात पूर्णपणे सूट असते. त्यामुळे अनेकजण याचा फायदा घेण्यासाठी यात गुंतवणूक करतात. 

समजा, परदेशात राहायला जाण्याआधी पीपीएफ खाते उघडले असल्यास 15 वर्षांचा कालावधी पूर्ण होईपर्यंत हे अकाउंट सुरू ठेवण्यास परवानगी असते. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर खाते बंद करून पैसे काढता येतात. तसेच, आधीच खाते उघडलेले असले तरीही परदेशातूनही पीपीएफ खात्यात पैसे जमा करणे शक्य आहे. 

NRI PPF खात्याची मुदत वाढवू शकतात का?

भारतात राहणारी व्यक्ती 15 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मुदत वाढवू शकते. परंतु, एनआरआय व्यक्तीला यासाठी परवानगी नसते. परदेशात स्थायी होण्यापूर्वी काढलेले खाते बंद करण्याची अथवा मूदत पूर्ण होईपर्यंतच सुरू ठेवण्याची मूभा त्याला असते. 

NRI PPF खात्यामधून पैसे कसे काढू शकते?

एनआरआय व्यक्ती दोन पद्धतीने पीपीएफ खात्यातून पैसे काढू शकते. एक म्हणजे मुदतपूर्वी व दुसरे म्हणजे 15 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर. मुदतपूर्व रक्कम काढण्यासाठी खाते उघडून 7 वर्ष पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे.

दोन्ही पद्धतीने काढलेले पैसे हे एनआरआयच्या NRO (non-resident ordinary) खात्यात जमा केले जातात. तसेच, पीपीएफ खात्यावर कर्ज देखील काढता येते. मात्र, कर्ज काढण्याची परवानगी तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतरच मिळते. 

NRIला PPFच्या रक्कमेवर करात सूट मिळते का?

पीपीएफच्या संपूर्ण रक्कमेवर करात सूट मिळते. एनआरआयला देखील याचा फायदा मिळतो. ज्या एनआरआयचे पीपीएफ खाते आधीपासूनच सुरू आहे, त्यांना मॅच्युरिटी व एनआरओ खात्यात जमा केलेल्या रक्कमेवर कर भरावा लागत नाही. परंतु, एनआरओ खात्याशी संबंधित काही नियम असल्यास कर भरावा लागू शकतो.

तसेच, तुम्ही पीपीएफ खात्यातून काढलेली रक्कम नातेवाईकांना भेट स्वरुपात देऊ शकता. पती-पत्नी, आई-वडील, मुलं व भाऊ-बहिणींना ही रक्कम भेट म्हणून देऊ शकता. तसेच, इतरांना 50 हजार रुपयांपर्यंत भेट दिलेली रक्कम करपात्र नाही. मात्र, यापेक्षा जास्त रक्कम भेट म्हणून दिल्यास कर भरावा लागेल. 

PPF संदर्भात समस्या असल्यास येथे करा तक्रार

तसेच, पीपीएफ व पीपीएफच्या रक्कमेवरील करासंदर्भात कोणतीही समस्या असल्यास एनआरआय ऑनलाइन तक्रार करू शकता. करासंदर्भात आयकर विभागाकडे तक्रार करू शकता.