• 07 Dec, 2022 08:12

Stocks vs Crypto : दोघांमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या!

Stocks Vs Crypto

Stocks vs Crypto : शेअर्स आणि क्रिप्टो याकडे गुंतवणुकीचे पर्याय म्हणून पाहिले जाते. क्रिप्टोमध्ये Volatility आणि Risk अधिक आहे. तसेच भारतात क्रिप्टोला कायदेशीर मान्यता नाही.

स्टॉक्स म्हणजेच शेअर्स हे खूप आधीपासून वापरात असलेले अॅसेट (Asset) आहेत. शेअर्सकडे लॉँग टर्म (Long Term) आणि शॉर्ट टर्म (Short Term) असे गुंतवणुकीचे दोन्ही पर्याय म्हणून पहिले जाते. तर क्रिप्टोकरन्सी हे एक नवीन अॅसेट आहे; ज्यामध्ये High Price Volatility आणि मोठ्या जोखमीचा समावेश आहे. तसेच भारतात क्रिप्टोला कायदेशीर मान्यताही नाही. या दोन्ही अॅसेट्सकडे गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आकर्षित झालेले आहेत. काय कारण असेल यामागे. चला तर मग जाणून घेऊयात स्टॉक्स आणि क्रिप्टोकरन्सीमधील फरक.

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? What is Cryptocurrency?

सोप्या भाषेत क्रिप्टोकरन्सी हे एक डिजिटल चलन आहे; (Cryptocurrency is digital currency) जे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे तयार केले गेले आहे. ह्यामध्ये होणारा व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी आणि तपासण्यासाठी क्रिप्टोग्राफिक तंत्राचा वापर केला जातो. क्रिप्टोकरन्सीचा वापर विनिमयाचे माध्यम (Medium Of Exchange) म्हणून मुख्यतः केला जातो. अनेक क्रिप्टोकरन्सीज विकेंद्रित नेटवर्कवर (Decentralised network) आधारित आहेत. क्रिप्टोकरन्सीजची मागणी मोठी असल्याने त्याच्या किमतीमध्ये मोठा फरक दिसून येतो.

स्टॉक्स म्हणजे काय ? What is Stocks?

स्टॉक्स म्हणजे एखाद्या व्यवसायातील इक्विटीची आंशिक मालकी. स्टॉक्स कंपनीचे बाजारातील मूल्य दर्शवतात. कंपनीच्या स्टॉक्सची मालकी असलेल्या गुंतवणूकदारांना कंपनीच्या फायद्यातील काही हिस्सा डिविडेंड (Dividend) स्वरूपात दिला जातो. कंपनीच्या स्टॉकची किंमत कंपनीच्या कामगिरीवर अवलंबून असते. 

क्रिप्टोकरन्सी आणि स्टॉक्समधील फरक (Difference between Crypto & Stocks)

Share Market VS Crypto Market

क्रिप्टोकरन्सी आणि स्टोक्स दोन्हीचा वापर गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. तरीसुद्धा स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणे व क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणे ह्यात मोठा फरक आहे. 

क्रिप्टो मध्ये गुंतवणूक केल्यानंतर स्टॉक्सप्रमाणे कोणत्याही कंपनीची कसलीही मालकी मिळत नाही. क्रिप्टो गुंतवणूकदारांना कसल्याही प्रकारचे डिविडेंड मिळत नाही. परंतु क्रिप्टोचा वापर कर्जाच्या स्वरूपात केला जाऊ शकतो. शेअर्समध्ये अशी सुविधा उपलब्ध नाही.

क्रिप्टो आणि शेअर्स यांची होणारी देवाण-घेवाण (Trading) देखील खूप वेगवेगळी आहे. क्रिप्टोमार्केट 24 तास सुरू असल्याने त्यामध्ये ट्रेडिंग कधीही केली जाऊ शकते. त्याउलट स्टॉकमार्केट दिवसातील ठराविक वेळेत सुरू असते आणि त्याचप्रमाणे आठवड्यातून काही दिवस बंद देखील असते.

स्टॉक्स की क्रिप्टो? Stocks or Crypto?

दोन्ही अॅसेट्समध्ये जोखीम आणि फायदा आहे. शेअर्स की क्रिप्टो हा निर्णय तुम्ही किती जोखीम उचलू शकता यावर अवलंबून आहे. गुंतवणुकीमध्ये यश मिळवायचे असेल तर रिस्क आणि रिवॉर्ड (Risk & Reward) यांचे आकलन करून त्यानुसार निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. रिस्क आणि रिवॉर्डचे गणित तुम्हाला समजले तर मग अॅसेट कोणतेही असो फायदा हा होतोच! 

अशावेळी एकांगी निर्णय घेण्याऐवजी तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय (Portfolio Diversify) केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे जेवढे तुमचे वय आणि जोखीम घेण्याची क्षमता आहे. त्यानुसार शेअर मार्केट आणि क्रिप्टो मार्केट या दोन्हीमध्ये ठराविक टक्क्यानुसार गुंतवणूक करू शकता. अनेक गुंतवणूकदार आपला पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय ठेवतात. जेणेकरून नुकसानीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. पण प्रत्येक गुंतवणूकदाराने इतरांच्या पोर्टफोलिओप्रमाणे आपला पोर्टफोलिओ बनवण्यापेक्षा स्वतः अभ्यास करून स्वतःचा पोर्टफोलिओ तयार करणे बेस्ट ठरू शकते.