Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Crowdfunding: भारतातील क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्म जाणून घ्या

Best Crowdfunding Platforms

Crowdfunding: भारतात वेगवेगळ्या प्रकारे क्राऊड फंडिंग करणारे प्लॅटफॉर्म आहेत. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेक स्टार्टअपने आपल्या उद्योगांसाठी निधी मिळवला आहे. हे प्लॅटफॉर्म फक्त निधीच मिळवून देत नाही. तर तुमच्या उद्योगाला पोषक असणारे ग्राहक, तज्ज्ञ अशा लोकांपर्यंत पोहचण्यास सुद्धा मदत करतात. अशाच काही क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्मची माहिती घेऊ.

Crowdfunding: नवीन उद्योजक, कलाकार आणि वैयक्तिक पातळीवर स्वत:चा व्यवसाय सुरू करणारे व्यावसायिक हे त्यांच्या प्रोजेक्टसाठी लोकांकडून निधी गोळा (Crowdfunding) करत आहेत. यासाठी आपल्या समाजात अनेक होतकरू व्यक्ती, संस्था आहेत. ज्या नवीन उद्योजकांना सढळहस्ताने मदत करत आहेत. क्राऊड फंडिंगसाठी मदत करणाऱ्या अशाच काही प्लॅटफॉर्मबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

भारतात वेगवेगळ्या प्रकारे क्राऊड फंडिंग करणारे प्लॅटफॉर्म आहेत. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेक स्टार्टअपने आपल्या उद्योगांसाठी निधी मिळवला आहे. हे प्लॅटफॉर्म फक्त निधीच मिळवून देत नाही. तर तुमच्या उद्योगाला पोषक असणारे ग्राहक, तज्ज्ञ अशा लोकांपर्यंत पोहचण्यास सुद्धा मदत करतात. भारतातील क्राऊड फंडिंगने सामाजिक विषयांपासून अनेक स्टार्टअप उद्योजकांना सढळहस्ते मदत केली आहे. तुम्हालाही तुमच्या उद्योगासाठी क्राऊड फंडिंग मिळवायचे असेल. तर आम्ही तुम्हाला अशा काही प्लॅटफॉर्मची माहिती देणार आहेत.

क्राऊड फंडिग म्हणजे काय?

क्राऊड फंडिंग (Crowdfunding) या शब्दातच त्याचा अर्थ आहे. तुमच्या व्यवसायासाठी किंवा प्रोजेक्टसाठी लागणारी गुंतवणूक किंवा भांडवल समाजातील लोकांकडून गोळा करायचे. यासाठी समाजाला अपील करून त्यांच्याकडून थेट मदत मागायची. या संकल्पनेला क्राऊड फंडिंग म्हटले जाते. भारतात साधारण वैयक्तिक पातळीवर एज्युकेशनल आणि मेडिकल कारणांसाठी समाजाकडून मदत मागितली जाते. पण या संकल्पनेने पुढचे पाऊल टाकत आता नवीन उद्योजक किंवा स्टार्टअप सुरू करणाऱ्या व्यक्ती देखील समाजाकडून, मोठ्या उद्योजकांकडून, कर्जाच्या स्वरूपात मदत करणाऱ्या संस्थांकडून मदत मागत आहेत.

Crowd Funding

क्राऊड फंडिंगसाठी मदत मागणाऱ्या स्टार्टअप किंवा नवीन कंपन्यांना आपला संपूर्ण वेळ क्राऊड फंडिंगच्या मदतीसाठी घालवणे परवडत नाही. यासाठी ते काही इतर संस्थांची मदत घेतात. या संस्था आपल्या वेबसाईटच्या मदतीने संबंधित कंपन्यांसाठी क्राऊड फंडिंग जमा करण्याचे काम करतात. यासाठी ती कंपनी या संस्थांना ठराविक टक्केवारी देते. अशा टक्केवारीवर काम करणाऱ्या भारतातील बेस्ट 10 प्लॅटफॉर्मबद्दल आपण जाणून घेणार आहोत.


क्राऊड फंडिंगमुळे भारतातील स्टार्टअप आणि वैयक्तिक पातळीवर व्यवसाय सुरु करणाऱ्या नवउद्योजकांना आर्थिक बळ मिळाले आहे. तसेच यामुळे अनेकांना वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती, आयडियाज् मिळाल्या. ज्याचा उपयोग स्टार्टअपला चांगला होत आहे.

क्राऊड फंडिंगबाबत भारतात काही नियम आहेत का?

होय, क्राऊड फंडिंगबाबत भारतात काही नियम आहेत. मेडिकल हेल्पबाबतही सरकारने काही नियम घालून दिले आहेत. इक्विटी क्राऊड फंडिंगवर सेबी (Securities and Exchange Board of India-SEBI) लक्ष ठेवून आहे; तर डेब्ट क्राऊड फंडिंगवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) लक्ष आहे.

भारतात क्राऊड फंडिंग कसे चालते?

भारतात कोणीही व्यक्ती वैयक्तिक पातळीवर एखादे कॅम्पेन राबवून किंवा क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांच्या प्रोजेक्टबाबत लोकांना मदतीसाठी अपील करू शकतात. या प्रोजेक्टमध्ये कोणीही सहभागी होऊन त्यांना आर्थिक मदत करू शकतो.