Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Crowd Funding: क्राऊड फंडिंग म्हणजे काय आणि यामुळे तुमचा व्यवसाय कसा वाढू शकतो?

What is Crowd Funding

Image Source : www.nrifinance.io

Crowd Funding: क्राऊड फंडिग संकल्पनेमुळे अनेक व्यावसायिक आणि संस्थांच्या आर्थिक धोरणांमध्ये बदल घडून आला आहे. 2023 मध्ये भारतात क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून 4.49 मिलिअन डॉलर्सचा निधी जमा होऊ शकतो.

क्राऊड फंडिंग हा एक ग्राहक, कुटुंब, मित्र, नातेवाईक आणि गुंतवणूकदारांकडून निधी उभारण्याचा पर्याय आहे. यातून नवख्या उद्योजकाला आपल्या व्यवसायासाठी फंड उभा करता येतो. यातून फक्त भांडवलच नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योजकांची पैशांव्यतिरिक्त मदत मिळते.

क्राऊड फंडिग संकल्पनेमुळे अनेक व्यावसायिक आणि संस्थांच्या आर्थिक धोरणांमध्ये बदल घडून आला आहे. statista.com या संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, जागतिक पातळीवर क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून यावर्षी 1.41 बिलिअन डॉलर्सची उलाढाल होण्याची शक्यता वर्तवली आहे. 2022 मध्ये ही उलाढाल 1.25 बिलिअन डॉलर्सपर्यंत गेली होती आणि येणाऱ्या 7 ते 8 वर्षांत म्हणजे साधारण 2030 पर्यंत ती 3.62 बिलिअन डॉलर्सपर्यंत जाऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. भारताचा विचार केला तर क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून 2023 मध्ये 4.49 मिलिअन डॉलर्स जमा होऊ शकतात.

Crowd Funding

क्राऊड फंडिंगचा सर्वाधिक वापर कोणाकडून होत आहे, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? बऱ्याच संस्था आणि छोटे व्यावसायिक आहेत; जे क्राऊड फंडिंगचा मोठ्या खुबीने वापर करत आहेत.

  • नवीन उद्योजक / स्टार्टअप्स
  • स्ट्रगल करणारे व्यावसायिक
  • स्वयंसेवी संस्था
  • धार्मिक संस्था
  • मेडिकल हेल्प
  • सामूहिक उपक्रम


नवीन उद्योजक आणि व्यावसायिकांची गरज लक्षात घेऊन अनेक वेबसाईट्स फक्त क्राऊड फंडिंगचे काम करत आहे. जगभरातील अशा वेबसाईट्सची संख्या हजाराच्या घरात गेल्याचे दिसून येते. भारतातही अशा वेबसाईट्स आहेत. ज्या क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून उद्योजकांना भांडवल मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. विशेष करून लहान उद्योजकांना आणि स्टार्टअप्सना भांडवल उभे करण्यासाठी खूप मेहनत आणि पैसा खर्च करावा लागतो. अशा उद्योजकांना क्राऊड फंडिंग हा एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. या अशा क्राऊड फंडिंगच्या वेबसाईटवरून नवीन उद्योजक त्यांच म्हणणे लोकांसमोर मांडून त्यांच्याकडे मदत मागू शकतात. यातून त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत होत आहे.

क्राऊड फंडिंगचे प्रकार

क्राऊड फंडिंगची ढोबळमानाने 3 प्रकारात विभागणी केली जाते. डोनेशन (आर्थिक मदत करणे), इक्विटी (भाग भांडवलासाठी मदत) आणि डेब्ट (कर्ज) रुपात मदत.

डोनेशन (Donation)

क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून डोनेशन उभारण्याचा प्रकार तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहित असेल. यामध्ये प्रामुख्याने मेडिकल डोनेशनचा भाग मोठा आहे. यासाठी काही सामाजिक संस्था प्रामुख्याने काम करतात. अशा डोनेशन फंडिंगमधून जमा होणारा निधी मेडिकल उपचार, एज्युकेशन किंवा काही सामुहिक उपक्रमांसाठी वापरला जातो.

इक्विटी (Equity Funding)

इक्विटी फंडिंगच्या माध्यमातून मदत करणाऱ्याला इक्विटीमध्ये मालकी दिली जाते आणि त्यातून कंपनीसाठी भांडवल उभे केले जाते. अशापद्धतीने स्टार्टअप्स काम करतात. या इक्विटी फंडिंगद्वारे मदत करणाऱ्याला लाभांश किंवा शेअर्समधील फायदादेखील दिला जातो.

डेब्ट फंडिंग (Debt Funding)

डेब्ट फंडिंगमध्ये कंपनी किंवा उद्योजकांकडून उधारीने किंवा कर्जाच्या रूपात पैसे घेतले जातात. या पैशांवर वर किती आणि कसे घ्यायचे. तसेच हे पैसे परत किती दिवसांत द्यायचे. या गोष्टी दोन्ही पार्टींच्या सहमतीने ठरते. त्यामुळे ज्या व्यावसायिकांना आपल्या कंपनीतील भागीदारी विकायची नाही. ते डेब्ट फंडिंगचा पर्याय स्वीकारू शकतात.

क्राऊड फंडिंगममुळे छोट्या व्यावसायिकांना आणि स्टार्टअप्सना भांडवल उभे करण्यासाठी चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. पण काही लोकांकडून अशा फंडचा दुरूपयोग केल्याचेही दिसून आले आहे. तर अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सेबीने एक मार्गदर्शक नियमावली तयार केली आहे. जेणे करून मदत करणाऱ्यांची आणि मदत घेणाऱ्यांचीही फसवणूक होणार नाही.

सेबीची क्राऊड फंडिग मार्गदर्शक नियमावली

  • क्राऊड फंडिंगची मदत घेणाऱ्या कंपनीची नोंदणी भारतात झालेली असावी.
  • कोणतीही कंपनी 10 कोटीपेक्षा जास्त रक्कम क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून जमा करू शकत नाही.
  • इक्विटी आणि डेब्ट फंडिंगच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांकडे इक्विटी आणि डिबेन्चचे अधिकार असणे गरजे आहे.
  • क्राऊड फंडिंग जमा करताना कंपनीला एका आर्थिक वर्षात 200 पेक्षा जास्त गुंतवणूकदारांना सामावून घेता येणार नाही.