जर तुम्ही वारंवार व्यवसायानिमित्त किंवा सहलीसाठी सतत देश-विदेशात प्रवास करत असाल तर प्रवासी क्रेडिट कार्ड (Travel Credit Card) तुमच्या कामाचे आहे. या कार्डने तुम्ही विमानप्रवास, रेल्वेप्रवास किंवा बसप्रवासाच्या तिकिटाचे बुकिंग करू शकता. ते बुकिंग करताना तुम्हाला वेगवेगळे रिवॉर्ड्स पॉईंट्स (Reward Points) मिळत असतात. ज्यांचा लाभ तुम्ही पुढच्या बुकिंगसाठी घेऊ शकता. याने तुमचा प्रवासाचा खर्च कमी होणार (Travel costs will be reduced) आहे.
ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड वापरण्याचे फायदे | Benefits of Travel Credit Card
क्रेडिट कार्ड वापल्याने रिवॉर्ड पॉइंट्स, लॉयल्टी प्रोग्राम्स, ट्रॅव्हल मेंबरशिप्स, स्टे व्हाउचर आणि ट्रॅव्हल इन्शुरन्स ते कॉम्प्लिमेंटरी एअरपोर्ट लाउंज ऍक्सेसपर्यंतचे अनेक फायदे मिळू शकतात. जर तुम्ही वारंवार प्रवास करत असाल तर या ऑफरच्या माध्यमातून तुम्हाला प्रवास खर्च, राहण्याच्या भाड्यात सूट मिळू शकते. सूट मिळाल्याने तुम्ही अधिक बचत करू शकता.
ट्रॅव्हल क्रेडिट कार्डचे प्रकार | Types of Travel Credit Card
ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड दोन प्रकारचे असतात, को-ब्रँडेड आणि जेनेरिक. को -ब्रँडेड म्हणजे एखाद्या एअरलाइन्स, ट्रॅव्हल पोर्टल्स यांच्या भागीदारीतून लॉन्च केलेले कार्ड असते. तर जेनेरिक ट्रॅव्हल कार्डमध्ये प्रवासाशी संबंधित खर्चावर अतिरिक्त फायदे किंवा रिवॉर्ड देतात, मग ते फ्लाईट बुकिंग असो किंवा हॉटेल मुक्काम असो. बाजारात ट्रॅव्हल कार्ड्सची भरपूर संख्या असल्याने योग्य कार्ड निवडणे कठीण आहे.
ट्रॅव्हल कार्ड निवडताना कोणत्या बाबींचा विचार करावा
- ट्रॅव्हल कार्ड निवडताना तुमच्या आणि कुटुंबाच्या प्रवासाचा अंदाज घ्या.
- जर तुम्ही विमानाने प्रवास करणार असाल तर असे कार्ड निवडावे जे विमानतळ लाउंज प्रवेशासाठी जास्त संधी देतं.
- तुम्ही देशांतर्गत प्रवास करत असल्यास, एअर इंडिया, विस्तारा किंवा इंडिगो सारख्या देशांतर्गत एअरलाइन्सशी टायअप करणारे कार्ड निवडा.
- तुम्ही ट्रेनमधून देशांतर्गत प्रवास करत असल्यास, IRCTC लिंक केलेले ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड निवडा.
- जर तुम्ही यात्रा किंवा मेकमायट्रिप सारख्या विशिष्ट बुकिंग पोर्टल वरून बुकिंग करत असाल तर या पोर्टलने टाय अप असलेले कार्ड निवडा.
- तसेच जर तुमची कोणतीही एअरलाईन, हॉटेल किंवा बुकिंग पोर्टल वापरण्यास हरकत नसल्यास, जेनेरिक कार्ड वापरू शकता.
बेस्ट ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड निवडण्यास तुम्हाला मदत व्हावी म्हणून आम्ही काही ट्रॅव्हल क्रेडिट कार्डची, को-ब्रँडेड आणि जेनेरिक अशा दोन्ही कार्डांची माहिती त्याच्या वैशिष्ट्यांसह देत आहोत.
इंटरमाइल्स एचडीएफसी बँक डायनर्स क्लब (INTERMILES HDFC BANK DINERS CLUB)
- हे ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड हवं असल्यास 5000 रुपयांच्या वार्षिक जॉयनिंग फी भरून मिळवू शकता.
- या कार्डसाठी 1.99 टक्के व्याजदर आहे.
- वापरकर्त्यांसाठी 2 कोटी रुपयांचे हवाई अपघात विमा संरक्षण देण्यात येते.
- 50 लाख रुपये तात्काळ परदेशात हॉस्पिटलायझेशन सुविधा मिळू शकते.
- कार्डच्या गोल्ड सदस्यत्वाला 25 हजारापर्यंत बोनस पॉईंट तर विमान प्रवासावर 2 हजार आणि हॉटेल डिस्काउंट व्हाउचरवर 3 हजार रुपयांपर्यंत सूट असते.
- इतिहाद एअरवेस (Etihad Airways)च्या बिझनेस आणि इकॉनॉमी क्लास तिकिटांवर 5 ते 10 टक्के सूट मिळते.
- flights.intermiles.com वर बुक केलेल्या EA तिकिटांसाठी 2.5 बोनस पॉईंट मिळतात.
- भारतातील तसेच जगातील 1,000 पेक्षा जास्त विमानतळाच्या लाउंज मध्ये थांबण्याची सुविधा मिळते.
अॅक्सिस बँक मिल्स अॅण्ड मोअर वर्ल्ड कार्ड (AXIS BANK MILES & MORE WORLD CARD)
- या क्रेडिट कार्डची वार्षिक जॉयनिंग फी 3,500 रुपये आहे.
- कार्डवर 3.6 टक्के व्याज आकारले जाते.
- प्रवासादरम्यान अपघात झाल्यास 2.5 कोटी रुपयांचे हवाई अपघात विमा संरक्षण मिळते
- कार्ड धारकाला 5,000 पॉईंटचा वेलकम बोनस, तर 3,000 पॉईंटचा वार्षिक बोनस.
- निवडक विमानतळ लाउंजला एका तिमाहीत 4 मोफत भेट देता येणार आहे तर प्रायॉरिटी पास लाउंज वर्षातून 2 वेळा जाता येणार आहे.
- Star Alliance आणि Miles & More एअरलाइन भागीदारांसह फ्लाइट्स बुक करून या कार्डचे पॉईंट्स रिडीम करता येतात.
- तसेच भागीदार रेस्टॉरंटवर किमान 15 टक्के सूट मिळते.
आयआरसीटीसी एसबीआय कार्ड प्रीमियर (IRCTC SBI CARD PREMIER)
- या कार्डची वार्षिक जॉयनिंग फी 1,499 रुपये आहे.
- या कार्डसाठी 3.5 टक्के व्याज दर आकारला जातो.
- 10 लाख रेल्वे अपघात विमा संरक्षण तर 50 लाखांचे हवाई अपघात विमा संरक्षणाचा लाभ मिळतो.
- 50,000 रुपयांच्या वार्षिक प्रवास खर्चावर 2,500 रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात.
- 1 लाख वार्षिक प्रवास खर्चावर 5,000 रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात.
- 2 लाखांच्या खर्चावर वार्षिक शुल्क परत परत केले जाते.
- irctc.co.in वर रेल्वे तिकीट बुकिंगवर 1 टक्के व्यवहार शुल्क माफ केले जाते.
- air.irctc.co.in वर फ्लाइट बुकिंगवर 1.8 टक्के ट्रान्झॅक्शन चार्ज माफ केले जाते.
- भारतातील सहभागी लाउंजसाठी वर्षभरात 8 मोफत रेल्वे लाउंज भेट देता येते.
एचडीएफसी बँक रेगालिया कार्ड (HDFC BANK REGALIA CARD)
- या कार्डची वार्षिक जॉईनिंग फी 2,500 रुपये आहे.
- तर कार्डाचे व्याजदर 3.6 टक्के आहे.
- ही क्रेडिट कार्ड कंपनी 1 कोटी अपघाती हवाई मृत्यूवर विमा संरक्षण देते.
- 12 भारतामध्ये आणि 6 भारताबाहेरील विमानतळ लाउंज भेट देता येते.
- एका वर्धापन दिनात 5 लाख रूपयांच्या खर्चावर 10,000 रिवॉर्ड पॉइंट्स आणि 8 लाख रूपयांच्या खर्चावर 5,000 रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात.
- मागील वर्षी 3 लाखांपेक्षा जास्त खर्च केल्यास नूतनीकरण शुल्क माफ करण्यात आले होते.
येस फस्ट प्रिफर्ड क्रेडिट कार्ड (YES FIRST PREFERRED CREDIT CARD)
- या क्रेडिटकार्डसाठी ग्राहकांना वार्षिक जॉयनिंग फी 999 रूपये भरावी लागेल.
- तर या क्रेडिट कार्डचे व्याज दर 3.5 टक्के आहे.
- हवाई अपघातांसाठी 1 कोटी रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते.
- परदेशात आपत्कालीन हॉस्पिटलायझेशनसाठी 25 लाख रुपये विमा संरक्षण मिळते.
- निवडक श्रेणी वगळता सर्व श्रेण्यांवर खर्च केलेल्या 200 रुपयांसाठी 8 रिवॉर्ड पॉइंट्स.
- भारतात दर तिमाहीत 2 मोफत देशांतर्गत विमानतळ लाउंज भेटी देता येतात.
- प्रत्येक वर्षात 4 वेळा मोफत विमानतळ लाउंजला जाऊ शकतो.
- तसेच भारतातील काही निवडक गोल्फ कोर्समध्ये प्रति वर्षात 4 वेळा जाऊ शकता.
- तर या क्रेडिटकार्डचा वापर इंधनासाठी केल्यास 1 टक्के अधिभार माफ होतो.
हे आहेत ट्रॅव्हल क्रेडिट कार्डचे फायदे. जर प्रवासाची आवड असेल तर या क्रेडिट कार्डने फिरण्यासोबत तुमची बचतही होईल.