सध्या बाजारपेठेत रिअल इस्टेट प्रॉपर्टीचे दर प्रचंड प्रमाणावर वाढले आहे. अशा परिस्थितीमध्ये एकरकमी पैसे देऊन मालमत्ता खरेदी करणे, प्रत्येकालाच शक्य होत नाही. लोकांचे हेच स्वप्न साकार करण्यासाठी बँकांकडून गृह कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या कर्जाच्या मदतीने ग्राहक स्वतःचे घर खरेदी करू शकतात. सध्या प्रत्येक बँकेचा गृह कर्जावरील व्याजदर हा वेगवेगळा आहे. सरकारी बँकांप्रमाणे खाजगी क्षेत्रातील बँका देखील ग्राहकांना गृह कर्जावर आकर्षक व्याजदर ऑफर करत आहेत.
खाजगी क्षेत्रातील पंजाब अँड सिंध बँक (Punjab & Sind Bank) देखील आपल्या ग्राहकांना गृह कर्जाची सुविधा (Home Loan) उपलब्ध करून देत आहे. ही बँक गृहकर्जावर कमीत कमी व्याजदर उपलब्ध करून देत आहे. तसेच इतर आकर्षक सुविधांचाही लाभ देखील बँकेच्या ग्राहकांना घेता येणार आहे. त्या सुविधा कोणत्या आणि बँकेचा गृह कर्जावरील व्याजदर किती? जाणून घेऊयात.
गृह कर्जावरील व्याजदर आणि इतर सुविधा जाणून घ्या
खाजगी क्षेत्रातील पंजाब अँड सिंध बँक (Punjab & Sind Bank) आपल्या ग्राहकांना गृहकर्जावर आकर्षक व्याजदर ऑफर करत आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाईटनुसार ही बँक आपल्या ग्राहकांना गृहकर्जावर वार्षिक 8.73% व्याजदर ऑफर करत आहे. ग्राहकांना जास्तीत जास्त 30 वर्षाच्या कालावधीसाठी गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. तसेच गृह कर्ज देण्यासाठी बँकेकडून कोणतीही प्रोसेसिंग फी घेतली जाणार नाही. याशिवाय लीगल अँड व्हॅल्युएशन फी देखील शून्य असणार आहे. जर तुम्हीही गृह कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर खाजगी क्षेत्रातील पंजाब अँड सिंध बँक हा एक सर्वोत्तम पर्याय उपलब्ध आहे.
25 लाखांच्या कर्जासाठी भरावा लागेल 'इतका' मासिक हप्ता
पंजाब अँड सिंध बँकेमधून ग्राहकांनी गृह कर्ज घेतले, तर त्यांना एकूण गृह कर्जाच्या रकमेवर 8.73% व्याजदर भरावा लागणार आहे. या हिशोबाने जर तुम्ही 25 लाखांचे कर्ज 20 वर्षाच्या मुदतीवर घेतले, तर ग्राहकांना मासिक 22,061 रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे. या कालावधीत तुम्हाला 27,94,610 रुपयांचे व्याज बँकेमध्ये भरावे लागणार आहे. 25 लाखांचे कर्ज ग्राहकांनी 30 वर्षाच्या मुदतीवर घेतले, तर त्यांना 19,632 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे. या कालावधीत 45, 67, 452 रुपयांचे व्याज बँकेमध्ये भरावे लागणार आहे.
खाजगी क्षेत्रातील ॲक्सिस बँक (Axis Bank) ग्राहकांना गृहकर्जावर 9% व्याजदर ऑफर करत आहे. तर कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) 8.75 % व्याजदर आकारत आहे.