Athiya Shetty and KL Rahul Wedding Gifts: बाॅलिवुडचे व क्रिकेटचा संबंधी आपल्यासाठी काही नवीन नाही. यापूर्वीदेखील अनेक सेलेब्रिटी व क्रिकटर लग्नबंधनात अडकले होते. जसे की, विराट कोहली व अनुष्का शर्मा (Virat kohli & Anushka sharma), सागरिका घाटगे व झहीर खान (Sagarika Ghatge & Zaheer Khan), हरभजन सिंग व गीता बासरा (Harbhajan Singh & Geeta Basra) आता या जोडयांपाठोपाठ अभिनेत्री अथिया शेट्टी व भारतीय संघाचा क्रिकेटर केएल. राहुल या दोघांनी ही सुनील शेट्टीच्या फाॅर्महाऊसवर सात फेरे घेतले आहेत. त्यांच्या या शाही लग्नाला बाॅलिवुड सेलेब्रिटींनी काय गिफ्ट दिले हे पाहुयात.
केएल राहुल व अथिया शेट्टी यांना बाॅलिवुड सेलेब्रिटींनी काय दिले गिफ्ट
अभिनेत्री अथिया शेट्टी व केएल. राहुल यांना सुनिल शेट्टी यांनी 50 करोडचा आलिशान फ्लॅट गिफ्ट म्हणून दिला आहे. सलमान खानने (Salman Khan) अथियाला 1.64 कोटी रुपयांची 'ऑडी कार' (Audi Car) गिफ्ट म्हणून दिली आहे. अभिनेता जॅकी श्रॉफने या जोडप्याला प्रसिद्ध ‘स्विस लक्झरी घड्याळ’ आणि ज्वेलरी ब्रँड ‘चोपार्ड वॉचेस’चे 30 लाख रुपयांचे घड्याळ भेट म्हणून दिले आहे. अथियाचा जवळचा मित्र असलेला अर्जुन कपूर याने आथियाला 1.50 करोडचे हिऱ्याचे कंगण दिले आहे.
केएल राहुल व अथिया शेट्टी यांना क्रिकेटरने काय दिले गिफ्ट
केएल राहुल व अथिया शेट्टी ही जोडी 23 जानेवारी 2023 रोजी विवाह बंधनात अडकले. या जोडीला भारतीय क्रिकेट टीमने हजेरी लावली नाही, पण त्यांचे गिफ्ट मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचले आहेत. यामध्ये या जोडीला विराट कोहली (Virat Kohli) याने 2.17 करोडीची ‘BMW कार’ गिफ्ट केली आहे, तर भारतीय टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याने 80,000 ची ‘कावासकी बाइक’ (Kawasaki Bike) गिफ्ट म्हणून दिली आहे. भारतीय टीम या लग्नाला उपस्थित नसले तरी, मुंबईमध्ये एक ग्रॅंड वेडिंग रिसेप्शन होणार आहे. या रिसेप्शन पार्टीला इंडियन टीम पोहचणार आहे. आयपीएलनंतर (IPL) या राॅयल वेडिंग रिसेप्शनचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
महागडे गिफ्ट दिल्याची बातम्या या अफवा आहेत
अभिनेत्री अथिया शेट्टी व केएल. राहुल यांच्या लग्नात महागडे गिफ्ट देण्यात आल्याची ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. लग्नानंतरच्या दोन दिवसात विविध माध्यमातून ही गिफ्टची यादी सोशलमिडीयावर व्हायरल होत होती. मात्र या महागडया गिफ्टबाबतच्या सर्व बातम्या एक प्रकारच्या अफवा आहेत, हे सर्व खोटे असल्याचे अभिनेता सुनिल शेट्टी यांच्या कुटुंबाकडून सांगण्यात आले आहेत.