Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sa Re Ga Ma Pa L'il Champs: जाणून घ्या,सारेगमप लिटिल चॅम्प्सची विजेती ठरलेल्या डोहना लामाला किती लाखाचे मिळाले बक्षिस

Sa Re Ga Ma Pa Lil Champs Winner 2023

Image Source : http://www.fashionchandigarh.com/

Sa Re Ga Ma Pa L'il Champs Winner: सारेगमप लिटिल चॅम्प्स सिझन-9 हा रियालिटी शो मागील काही दिवसांपासून अधिक चर्चेत होता. या शो मधील चिमुरडयांनी आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मागील काही महिन्यांपासून मंत्रमुग्ध केले होते. अखेर या शो चा फिनाले नुकताच संपन्न झाला. या फिनालेमध्ये अवघ्या नऊ वर्षांच्या जेटशेन डोहना लामा हिने बाजी मारली. तिला किती लाखाचे बक्षिस व आणखी काय मिळाले याबाबत माहिती घेवुयात.

Sa Re Ga Ma Pa Lil Champs Winner 2023: सारेगमप लिटिल चॅम्प्स सिझन-9 (Sa Re Ga Ma Pa L'il Champs Sizen 9) हा रियालिटी शो चा विजेता कोण होणार या चर्चेला अखेर पूर्ण विराम मिळाला आहे. नुकताच या शो चा फिनाले झाला आहे. या फिनाले एपिसोडमध्ये शो ची विजेती जेटशेन डोहना लामा (Jetshen Dohna Lama) ही ठरली आहे. अवघ्या नऊ वर्षाच्या या चिमुरडीचे यश पाहून रसिकदेखील भारावून गेले आहे.

काय मिळाले बक्षिस (What Prize did You Get)  

'सारेगमप' लिटिल चॅम्प्स सिझन-9 या कार्यक्रमाचा शेवटचा एपिसोड नुकताच संपला आहे. या रियालिटी कार्यक्रमात मागील काही महिन्यांपासून देशातील काना-कोपऱ्यातून आलेल्या चिमुरडयांनी आपल्या आवाजाने भारतीय रसिकांना मंत्रमुग्ध करून सोडले आहे. या शो मध्ये एक से एक बढकर चिमुरडे होते. ज्यांनी आपल्या आवाजाने रसिकांच्या मनावर जादू केली. मात्र आता या शो चा शेवटचा एपिसोड झाला असून, या रियालिटी शो चा विजेता घोषित करण्यात आला आहे. या 'सारेगमप' लिटिल चॅम्प्स सिझन-9 या शो ची विजेती अवघ्या नऊ वर्षांची ‘जेटशेन डोहना लामा’ ही ठरली आहे. तिने बक्षिस स्वरूपात ट्रॉफीसह दहा लाख रूपयांची कमाई केली आहे.

विजेती जेटशेनची प्रतिक्रिया (Winner Jetshen's Reaction)

'सारेगमप' लिटिल चॅम्प्स सिझन-9 या रियालिटी शो चे परिक्षक शंकर महादेवन (Shankar Mahadevan), अनु मलिक  (Anu Malik) आणि निती मोहन (Neeti Mohan) यांनी केले. तर कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh) यांनी या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन केले. जेटशेन डोहना लामा ही या कार्यक्रमाची विनर ठरली असून हर्ष सिकंदर (Harsh Sikandar) व ज्ञानेश्वरी घाडगे (Dnyaneshwari Ghadge) हे पहिले आणि दुसरे रनरअप ठरले. विशेष म्हणजे या फिनाले एपिसोडला अभिनेते जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) आणि चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांनी हजेरी लावली होती. 'माझं स्वप्न पूर्ण झाले आहे, माझ्यासाठी ही स्पर्धा खूप कठीण होती. कारण या सिझनमधील स्पर्धक खूप टॅलेंडेट होते. मी सगळ्यांचे आभार मानते.' अशी प्रतिक्रिया विजेती जेटशेन हिने व्यक्त केली.