What is Difference Between Hotel, Motel and Resort: आपल्याला ही हा अनुभव नक्की आला असणार. जसे की, मित्र-मैत्रिणींसोबत व इतर ठिकाणी गप्पे मारताना किंवा ट्रीपचा प्लॅन करताना मित्र म्हणतात, हॉटेल बुक केले आहे, तर दुसरा म्हणतो हॉटेल नाही रे... रेस्टॉरंट.. पण त्यातीलच काहीजण म्हणतात, हॉटेल काय अन् ... रेस्टॉरंट काय एकच.. पण तुम्हाला सांगू का, हॉटेल व ... रेस्टॉरंट या दोन गोष्टी वेगळया आहेत. एवढेच नाही तर मॉटेल व रिसॉर्ट या ही दोन भिन्न गोष्ट आहेत. म्हणजेच थोडक्यात हॉटेल, रिसॉर्ट, रेस्टॉरंट व मॉटेल या चार ही गोष्टी पूर्णपणे वेगवेगळया आहेत. त्या नक्की काय आहेत, हे आपण जाणून घेवुयात.
Table of contents [Show]
हॉटेल (Hotel)
आपल्याला हॉटेल म्हणजे फक्त खाण्याचे ठिकाण आहे असे वाटते. पण यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो. जसे की, राहण्याची सोय, वाहनांसाठी पार्किंगची सोय, जेवणाची सोय तसेच हॉटेल रूममध्ये गेस्टसाठी मिनी बार, जेवण, टी.व्ही, फ्रीज, टेलिफोन, वाय-फाय यासारख्या अनेक सोई-सुविधा असतात. हे हॉटेल तुम्हाला पर्यटनस्थळे, विमानतळ, एसटी स्टॅंड व रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला मोठया प्रमाणात पहायला मिळतील. भारतात ताज, ओबेरॉय,रॅडिसन, ली मेरिडिअन हे नामांकित हॉटेल आहेत. तसेच लोकांच्या सोई- सुविधा व बजेटनुसार हॉटेलची टू स्टार, थ्री स्टार, फोर स्टार, फाईव्ह स्टार आणि सेव्हन स्टार यामध्ये विभागणी केली गेली आहे.
मॉटेल (Motel)
मॉटेल हा प्रकार आपल्याला नेहमी हायवेवर पाहायला मिळतात. मॉटेल हा शब्द मोटर (Motar) आणि हॉटेल (Hotel) या दोन शब्दांना जोडून तयार करण्यात आला आहे. शक्यतो मॉटेल हा प्रकार परदेशात पाहायला मिळतात. लांबच्या पल्ल्याचा प्रवास करत असाल, तर विश्रांतीसाठी हायवेवर मॉटेल असतात. या मॉटेलच्या खोल्या जास्त मोठया नसतात फक्त आराम मिळेल या विचाराने त्या तयार केलेल्या असतात. येथे पार्किंगची सोय असते पण जेवणाची सोय नसते. हे राहण्यासाठी स्वस्त व मस्त असतात.
रेस्टॉरंट (Restaurant)
आपल्याकडे शक्यतो हॉटेलाच रेस्टॉरंट म्हटले जाते. मात्र हे चुकीचे आहे. रेस्टॉरंट म्हणजे फक्त खाण्याची जागा असते. येथे राहण्याची सोय नसते, जी फक्त हॉटेलमध्ये असते. शहराच्या मध्यभागी किंवा हायवेवर मोठया प्रमाणात रेस्टॉरंट पाहायला मिळतात.
रिसॉर्ट (Resort)
रिसॉर्ट हे नेहमी निसर्गरम्य ठिकाणी असते. याठिकाणी लोक धावपळीच्या जीवनातून थोड विश्रांती घेण्यासाठी रिसॉर्ट हे बुक करतात. अर्थातच, हे एक टुरिस्ट लोकेशन प्लेस आहे. हे एका प्रशस्त ठिकाणी असते. रिसॉर्ट बुकींगसाठी अधिक पैसा खर्च करावा लागतो. कारण याठिकाणी मनोरंजनाच्या सुविधा, स्विमिंग पूल, जिम, स्पासारख्या लग्झरी सुविधा उपलब्ध असतात. हल्ली रिसॉर्टवर जाण्याची क्रेझ सुरू आहे.