• 24 Sep, 2023 02:42

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC Jeevan Tarun Policy : एलआयसी जीवन तरुण पॉलिसी कोणाला लागू होते? जाणून घ्या संपूर्ण माहिती!

LIC Jeevan Tarun Policy

LIC Jeevan Tarun Policy : भारतातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी असलेल्या एलआयसीने नेहमीच नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत. या योजनांमधून गुंतवणूकदाराला आर्थिक सुरक्षिततेबरोबरच गुंतवणुकीचा पर्यायसुद्धा उपलब्ध झाला आहे.

भारतातील सर्वात मोठी सरकारी इन्शुरन्स कंपनी असलेल्या एलआयसीने नेहमीच नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना आणून गुंतवणुकीचा मार्ग खुला केला आहे. एलआयसीने आता इतर नागरिकांप्रमाणेच लहान मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने एक नवीन योजना आणली आहे. एलआयसी जीवन तरुण पॉलिसी (LIC Jeevan Tarun Policy) असे या योजनेचे नाव असून लहान मुलांसाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे. कमी पैशांची गुंतवणूक करून सुरु केलेल्या या पॉलिसीमुळे लहान मुलांना भविष्यात जास्त पैशांचा फायदा होणार आहे. मुलांच्या गरजा, शिक्षणाच्या सोयी-सुविधा लक्षात घेऊन या योजनेत गुंतवणूक (Investment) करता येऊ शकते. सुरक्षा आणि बचत या गोष्टी या योजनेमार्फत पूर्ण होण्यास मदत होऊ शकेल.

गुंतवणूक करण्यासाठी वयोमर्यादा

 • एलआयसी जीवन तरुण पॉलिसी घेण्यासाठी मुलाचे वय कमीत कमी 3 महिने अर्थात 90 दिवस असावे.
 • एलआयसी जीवन तरुण पॉलिसी घेण्यासाठी मुलाचे वय जास्तीत जास्त 12 वर्ष असावे.
 • मुलाचे वय 20 वर्षे होईपर्यंत या पॉलिसीअंतर्गत प्रीमियम भरणे आवश्यक आहे.
 • मुलाचे वय 25 वर्षे इतके झाल्यानंतर या पॉलिसीचा लाभ घेता येऊ शकतो.

महत्त्वाच्या अटी व नियम

 1. एलआयसी जीवन तरुण पॉलिसीची कमीत कमी विमा रक्कम 75000 रुपये आहे.
 2. जास्तीत जास्त रक्कम निश्चित केलेली नसल्यामुळे बजेटनुसार ग्राहक गुंतवणूक करू शकतात.
 3. सदर पॉलिसी मुलाच्या नावानेच घेता येत असल्यामुळे यातून मिळणारी रक्कम फक्त मुलाकडे जाते.
 4. मूल 20 वर्षाचे होईपर्यंत प्रीमियम भरायचा असल्याने ग्राहक त्यांच्या सोयीनुसार 3 महिने, 6 महिने आणि वार्षिक प्रीमियम भरू शकतात.
 5. जीवन तरुण पॉलिसीमध्ये दररोज 150 रुपये गुंतवले तर वार्षिक प्रीमियम 54000 इतका असेल.

गुंतवणुकीचा फायदा काय?

 • नियमितपणे गुंतवणूक केली तर 8 वर्षात 4 लाख 32 हजारांची गुंतवणूक होईल. 
 • केलेल्या गुंतवणुकीवर 2 लाख 47 हजार रुपयांचा बोनस मिळेल.
 • या पॉलिसीची विमा रक्कम 5 लाख रुपये असेल.
 • ग्राहकांना लॉयल्टी बोनस म्हणून 97000 रुपये मिळतील.
 • या पॉलिसीअंतर्गत एकूण 8 लाख 44 हजार 550 इतकी रक्कम मिळेल.  

गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला तर?

पॉलिसीच्या मुदती दरम्यान पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास प्रीमियम,अतिरिक्त प्रीमियम, रायडर प्रीमियम,व्याज आणि कर काढून उरलेली रक्कम दिली जाते. पॉलिसीच्या मुदती दरम्यान पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास वार्षिक प्रीमियमच्या 10 पट रक्कम किंवा 125 टक्के विमा रक्कम देण्यात येते.