Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBI Pension Seva: घरबसल्या मिनिटात होईल पेन्शन संबंधित कोणतेही काम, जाणून घ्या या 'खास' सेवेबद्दल

SBI Pension Seva Portal

Image Source : https://pmmodiyojana.in/

एसबीआयने पेन्शनधारकांसाठी खास पोर्टल सुरू केले आहे. या वेबसाइटच्या माध्यमातून पेन्शनसंबंधित सर्व सेवांचा लाभ घेता येईल.

भारतात पेन्शनधारकांची संख्या मोठी आहे. खासकरून, केंद्र सरकार व राज्य सरकारच्या सेवांमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन हा महत्त्वाचा आर्थिक आधार असतो. अनेकदा पेन्शन संदर्भातील सेवांचा लाभ घेताना अडचणी येत असतात. तसेच, अनेकदा बँकेच्या चक्करा माराव्या लागतात. मात्र, तुमचे पेन्शन खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) असल्यास तुम्हाला सर्व सुविधांचा लाभ एकाच क्लिकवर मिळेल.

एसबीआयने पेन्शनधारकांसाठी खास https://www.pensionseva.sbi/ ही वेबसाइट सुरू केली आहे. या वेबसाइटच्या माध्यमातून घरबसल्यास एका क्लिकवर पेन्शन संबंधित अनेक सेवांचा लाभ घेता येईल. तुमचे एसबीआय बँकेत पेन्शन खाते असल्या या वेबसाइटवर नोंदणी करून या सेवांचा लाभ घेऊ शकता. या वेबसाइटवर कशाप्रकारे नोंदणी करू शकता? याद्वारे कोणकोणत्या सेवांचा फायदा मिळेल? याविषयी सविस्तर जाणून घ्या.

एसबीआयच्या वेबसाइटद्वारे घेता येईल या सेवांचा लाभ

  •  पेन्शन स्लीप/ फॉर्म 16 डाउनलोड करणे.
  • पेन्शनशी संबंधित व्यवहारांची माहिती.
  • एरियर कॅलक्यूलेशन शीट्स डाउनलोड करू शकता.
  • गुंतवणुकीशी संबंधित माहिती मिळेल.
  • जीवन प्रमाणपत्राची स्थिती.
  • पेन्शन प्रोफाइलबाबतची माहिती या वेबसाइटवर मिळेल.

एसबीआयच्या पेन्शन सेवा वेबसाइटवर अशाप्रकारे करा रजिस्ट्रेशन

  • एसबीआयच्या माध्यमातून पेन्शन सेवांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम https://www.pensionseva.sbi/ या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करावे लागेल.
  • वेबसाइटवर गेल्यानंतर New Registration पर्यायावर क्लिक करा.
  • पुढे तुमचा अकाउंट नंबर व इतर माहिती भरा.
  • त्यानंतर एक यूजर आयडी तयार करा व तेथे नमूद केल्याप्रमाणे इतर माहिती भरा.
  • तुमच्या जन्मतारखेची माहिती द्या.
  • आता पेन्शन पेमेंट ब्रँचचा कोड टाका.
  • त्यानंतर ईमेल आयडी व पासवर्ड टाका.
  • या प्रोसेसनंतर तुमच्या ईमेल आयडीवर एक मेल येईल. या ईमेलमधील अकाउंट अ‍ॅक्टिव्हेशन लिंकवर क्लिक केल्यास अकाउंट सुरू होईल. यानंतर तुम्ही लॉग इन करून सेवांचा लाभ घेऊ शकता.

पेन्शनधारकांना मिळेल या सुविधांचा फायदा

  •  पेन्शन पेमेंटबाबत एसएमएसच्या माध्यमातून फोनवर मिळेल माहिती.
  • एसबीआयच्या सर्व शाखांमध्ये मिळेल जीवनप्रमाणची सुविधा.
  • एसबीआयच्या कोणत्याही शाखेत जीवन प्रमाणपत्र जमा करू शकता.
  •  ईमेलवर उपलब्ध होईल पेन्शन स्लीप.

तसेच, पेन्शन संदर्भात कोणतीही समस्या असल्यास एसबीआय खातेधारक 18001234/18002100/18004253800/1800112211 आणि  080-26599990 या क्रमांकावर कॉल करून माहिती घेऊ शकतात. ही सुविधा 24X7 सुरू असते. तसेच, support.pensionseva@sbi.co.in यावर देखील मेल करता येईल.