Quant Active Fund Direct Plan: क्वांट म्युच्युअल फंड हाऊसद्वारे क्वांट अॅक्टिव्ह म्युच्युअल फंड योजना 2001 सालापासून सुरू आहे. या योजनेत ब्रोकर आणि वितरकांद्वारे रेग्युलर प्लॅन आणि थेट फंड हाऊसशी संपर्क साधून डायरेक्ट पद्धतीने पैसे गुंतवता येतील. दोन्हीपैकी तुम्हाला जे सोपे वाटेल त्या मार्गाने गुंतवणूक करू शकता. रेग्युलर प्लॅनमध्ये एक्सपेन्स रेशो जास्त आहे.
क्वांट अॅक्टिव्ह म्युच्युअल फंड डायरेक्ट प्लॅनची माहिती या लेखात पाहूया. हा फंड NIFTY 500 मल्टी कॅप इंडेक्सवर आधारित आहे. या फंडमध्ये एकूण 5688 कोटी रुपये गुंतवणूक आहे. डायरेक्ट प्लॅनचा एक्सपेन्स रेशो 0.77% आहे. जर तुम्ही रेग्युलर मार्गाने गुंतवणूक करत असाल तर एक्सपेन्स रेशो 1.84% आहे. सध्या या योजनेतील गुंतवणुकीचा NAV 509.92 रुपये आहे. कंपन्यांच्या इक्विटीमध्ये फंड पैसे लावत असल्याने योजनेत जोखीमही जास्त आहे.
किती रुपये गुंतवणूक करू शकता?
डायरेक्ट आणि रेग्युलर योजनेत एकरकमी किंवा SIP मार्गाने गुंतवणूक करता येईल. SIP साठी कमीत कमी मासिक 1 हजार रुपये गुंतवणूक करावी लागेल. हा एक मल्टी कॅप फंड आहे. मोठ्या, लहान आणि मध्यम स्वरुपाचे भांडवल असणाऱ्या कंपन्यांमध्ये योजनेतील पैसे विभागून लावले जातात.
एकूण फंड हाऊसकडील रकमेपैकी 80 टक्के रक्कम स्थानिक कंपन्यांच्या इक्विटी शेअर्समध्ये करण्यात आली आहे. डेट पर्यायांमध्ये सुमारे 4 टक्के गुंतवणूक आहे. जे गुंतवणूकदार तीन ते चार वर्ष गुंतवणुकीस तयार आहेत, त्यांना योजना फायद्याची ठरू शकते. फंडची Crisil रँक 4 होती. मात्र, मागील तिमाहीत रँक 3 करण्यात आली आहे.
योजनेतून परतावा किती?
1 वर्षाच्या गुंतवणुकीतून 19% परतावा मिळाला तर 3 वर्षाच्या गुंतवणुकीतून 34 टक्के आणि 5 वर्षाच्या गुंतवणुकीतून 24.92% परतावा मिळाला.
सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या कंपन्यांमध्ये?
एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, आरोबिंदो फार्मा, स्टेट बँक, लिंडे इंडिया, बिकाजी फूड्स, पंजाब नॅशनल बँकेत फंडांची सर्वाधिक गुंतवणूक आहे.
(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)