Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PMJJBY: प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेबद्दल, माहित करून घ्या

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojan, Life Insurancea,

Image Source : http://www.ibef.org/

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana: भारत सरकारकडून प्रत्येक वर्गातील लोकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. यापैकी एक योजना आहे, जी कमी उत्पन्न असलेल्या लोकांना लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना असे या योजनेचे नाव आहे.

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana: केंद्र सरकारकडून प्रत्येक वर्गातील लोकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. यापैकी एक योजना आहे, जी कमी उत्पन्न असलेल्या लोकांना लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY)असे या योजनेचे नाव आहे. ही योजना विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाखांपर्यंतची आर्थिक मदत पुरवते. तुम्ही वार्षिक फक्त 436 रुपये भरून ही योजना घेऊ शकता. ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी, तुमचे किमान वय 18 वर्षे आहे, तर कमाल वय 55 वर्षे निश्चित केले आहे, या योजनेचे डिटेल्स जाणून घेऊया. 

वैद्यकीय तपासणी आवश्यक नाही (No medical examination is required)

ही पॉलिसी घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय चाचणीची आवश्यकता नाही. विमा पॉलिसीच्या संमती पत्रात काही आजार नमूद केले आहेत, तुम्हाला त्या आजारांनी ग्रासलेले नसल्याचे जाहीरनाम्यात सांगावे लागेल. तुमची घोषणा चुकीची असल्याचे सिद्ध झाल्यास तुमच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. याशिवाय, या योजनेत विमा प्रीमियम म्हणून जमा केलेल्या रकमेवर कलम 80C अंतर्गत कर सूट देखील मिळू शकते.

कागदपत्रे (Documents)

  • आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • बँक खाते पासबुक
  • मोबाईल नंबर 
  • पासपोर्ट साईज फोटो

नोंदणी अटी (Registration Terms)

  • तुम्हाला तुमचा बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक करावा लागेल कारण तुमची ओळख आधारद्वारे ठरवली जाते.
  • पॉलिसी वर्ष 1 जून ते 31 मे पर्यंत आहे. 
  • एक वेळची गुंतवणूक एका वर्षासाठी असते.
  • जर तुम्हीऑटोमॅटिक रिन्यूअल निवडले असेल, तर दरवर्षी 25 मे ते 31 मे दरम्यान, तुमच्या खात्यातून पॉलिसीचे 436 रुपये आपोआप कापले जातात.
  • तुम्ही फक्त तुमच्या एकाच बँक खात्यातून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेऊ शकता. 
  • ही पॉलिसी इतर कोणत्याही खात्याशी लिंक केली जाऊ शकत नाही.
  • पॉलिसी घेतल्याच्या ४५ दिवसांनंतरच या विमा संरक्षणाचा लाभ मिळतो. 
  • अपघातात मृत्यू झाल्यास ४५ दिवसांची अट वैध नाही.

पॉलिसी कशी घ्यावी? (How to get a policy?)

तुम्हालाही ही पॉलिसी घ्यायची असेल, तर तुमचे खाते असलेल्या बँकेतून तुम्ही त्याचा फॉर्म घेऊ शकता. पॉलिसीसाठी खातेदार त्याच्या खात्यातून पैसे कापण्यास तयार आहे की नाही याची फॉर्मद्वारे संमती घेतली जाते. यानंतर उर्वरित काम बँकेकडूनच केले जाते. याशिवाय काही बँकांनी या पॉलिसीची सुविधा नेटबँकिंगद्वारे तर काहींनी एसएमएसद्वारेही देण्यास सुरुवात केली आहे.