Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PM YASASVI Scheme : काय आहे पीएम यशस्वी योजनेचे स्वरूप? जाणून घ्या ऑनलाइन नोंदणी आणि फायदे

Pm Yashasvi scholarship

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान यंग अ‍ॅचिव्हर्स स्कॉलरशिप अ‍ॅवार्ड स्कीम फॉर व्हायब्रंट इंडिया (PM YASASVI) योजना सुरू करण्यात आली आहे. ही शिष्यवृत्ती योजना इयत्ता नववी (IX) आणि अकरावी(XI)च्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे.

आर्थिक अथवा सामाजिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी सरकारच्या विविध विभागाकडून अनेक योजना राबवल्या जातात. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्तीही दिल्या जातात. अशा प्रकारच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती राज्य, केंद्र सरकार अथवा एखाद्या खासगी संस्थेकडून देखील देण्यात येते. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने पंतप्रधान यशस्वी शिष्यवृत्ती योजना (PM Yashasvi Scholarship) राबवली जाते. या शिष्यवृत्तीचे नेमके स्वरूप काय आहे हे आज आपण जाणून घेऊया..

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान यंग अ‍ॅचिव्हर्स स्कॉलरशिप अ‍ॅवार्ड स्कीम फॉर व्हायब्रंट इंडिया (PM YASASVI) योजना सुरू करण्यात आली आहे. ही शिष्यवृत्ती योजना इयत्ता नववी (IX) आणि अकरावी(XI)च्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे.

शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचे निकष काय आहेत?

पंतप्रधान यशस्वी शिष्यवृत्ती (Pm yashasvi scholarship) योजनेसाठी विद्यार्थी भारतीय असावा. तसेच तो ओबीसी, ईबीसी, एनटी यापैकी एका प्रवर्गातील असावा. तसेच ही शिष्यवृत्ती इयत्ता 9 वी किंवा इयत्ता 11 वी साठी दिली जाते. त्यामुळे चालू वर्षात शिक्षण घेणारे (इयत्ता नववी किंवा इयत्ता अकरावी)  विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र मानले जातात. अर्जदाराचे पालकाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असावे.  तसेच या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याने आवश्यक पात्रता परीक्षा पास होणे गरजेचे आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करून परीक्षा द्यावी. शिष्यवृत्तीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळवण्यास पात्र ठरतो.

शिष्यवृत्तीचे फायदे

या शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे 5500 विद्यार्थ्यांना लाभ मिळतो. या शिष्यवृत्ती योजनेद्वारे चाचणी परीक्षा देऊन पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक स्वरुपात सहाय्य केले जाते.यामध्ये इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना वर्षाला 75,000 आणि इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांना वर्षाला 1,25,000 रुपये दिले जातात.

पंतप्रधान यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2023 अर्ज प्रक्रिया

चालू शैक्षणिक वर्ष 2023 मध्ये पंतप्रधान यशस्वी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. या योजनेसाठी विद्यार्थ्यांना  https://yet.nta.ac.in या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. यासाठी 11 जुलै पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 ऑगस्ट 2023 आहे. परीक्षेसाठी उमेदवारांकडून  कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.  तसेच इयत्ता 9 वी साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 01-04-2007 ते 31-03-2011 दरम्यान झालेला असावा. तर इयत्ता 11 वी साठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचा जन्म 01-04-2005 ते 31-03-2009 दरम्यान झालेला असावा. यासाठीची पात्रता परीक्षा  शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे.

अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • स्वाक्षरी
  • जात प्रवर्ग प्रमाणपत्र
  • कौटुंबिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • शैक्षणिक उत्तीर्ण प्रमाणपत्र (आठवी दहावी)