Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Traffic Challan : वाहतूक नियम मोडल्यानंतर लावलेला दंड ऑनलाइन कसा भरायचा?

Traffic Challan :  वाहतूक नियम मोडल्यानंतर लावलेला दंड ऑनलाइन कसा भरायचा?

Image Source : www.paytm.com

एखाद्यावेळी आपल्याकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास अथवा तुम्हाला वाहतूक पोलिसांनी नियमांप्रमाणे दंड आकारल्यास त्याची रक्कम ऑनलाईन भरता येते. त्याच बरोबर तुम्हाला तुमच्या वाहनावर ई-चलन कारवाई झाली आहे किंवा नाही हे देखील जाणून घेण्यासाठी https://mahatrafficechallan.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन त्याची माहिती मिळवता येते.

Traffic challan Online Payment : दिवसेंदिवस वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याच प्रमाणे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांच्याही संख्येत तेवढ्याच पटीने वाढ होताना दिसून येत आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यास वाहन चालकाकडून नियमांप्रमाणे दंड (Traffic challan) आकारला जातो. वाहतूक पोलीस विभागाकडून काही वेळा तुमच्या वाहनांवर ऑनलाईन पद्धतीने दंडात्मक कारवाई केली जाते. तुम्हाला हा दंड रोखीने आणि अथवा ऑनलाइनही भरता येतो. जर तुम्हाला अशा प्रकारे ई चलान आकारण्यात आले असेल तर त्याची माहिती कशी घ्यायची ते कसे भरायचे? याबाबतची माहिती आज आपण जाणून घेऊयात.

वाहतूक पोलीस विभागाकडूनही आता ऑनलाईन पद्धतीने कार्यवाही आणि कारवाई करण्यात येत आहे. महामार्गावर अथवा शहरात गर्दीच्या ठिकाणी आपणास सीसीटीव्ही कॅमेरे दिसून येतात. या माध्यमातून वाहतूक पोलीस विभाग वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ई चलानची कारवाई करते. तसेच तुम्ही एखाद्यावेळी वाहतूकीचा नियम मोडला असेल जसे की सिग्नल तोडणे, नोंदणी न करता वाहन चालवणे, लायसन्सशिवाय वाहन चालवणे, अतिवेगाने वाहन चालवणे, मद्यपान करून वाहन चालवणे इत्यादी वाहतूक गुन्ह्यांसाठी तुम्हाला  ई-चलान आकारले जाते.याची माहिती तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरही प्राप्त होते.

 ई चलान तपासणे अथवा भरणे

समजा एखाद्यावेळी आपल्याकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास अथवा तुम्हाला वाहतूक पोलिसांनी नियमांप्रमाणे दंड आकारल्यास त्याची रक्कम ऑनलाईन भरता येते. त्याच बरोबर तुम्हाला तुमच्या वाहनावर ई-चलन कारवाई झाली आहे किंवा नाही हे देखील जाणून घेण्यासाठी https://mahatrafficechallan.gov.in  या संकेतस्थळाला भेट देऊन त्याची माहिती मिळवता येते. तसेच तुम्हाला ई चलनाची रक्कम याच संकेतस्थळावरून ऑनलाईन देखील जमा करता येते. पुढील स्टेप नुसार तुम्ही चलान चेक करून पेमेंट करू शकता

ई-चलानचे ऑनलाइन पेमेंट

  • सरुवातीला तुम्हाला https://mahatrafficechallan.gov.in संकेतस्थळ उघडावे  लागेल
  • या ठिकाणी तुम्हाला दोन पर्याय उपलब्ध होतील
  • पहिल्या पर्यायात तुम्ही तुम्हाला आकारण्यात आलेल्या ई चलनाची माहिती घेऊ शकता
  • यासाठी तुम्हाला Vehicle No या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • यामध्ये तुम्हाला तुमचा गाडी नंबर आणि गाडीच्या इंजीनचे शेवटचे 4 आकडे टाकावे लागतील
  • त्यानंतर कॅप्चाची पडताळणी करावी लागेल. 
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या गाडीवर किती दंड आकारण्यात आला आहे याचा संपूर्ण तपशील उपलब्ध होईल
  • तसेच तुम्हाला VIEW पर्यायामधून तुमच्या गाडीचा तपशील जाणून घेता येऊ शकतो.

थेट चलान भरणे Traffic challan Online Payment 

  • या प्रक्रियेत तुम्हाला थेट ई चलानचा क्रमांक टाकायचा आहे
  • तुम्हाला कारवाई केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल वर चलान क्रमांक प्राप्त झालेला असतो
  • चलान क्रमांक टाकून तुम्ही दंडाची रक्कम ऑनलाईन भरू शकता

दंडाची रक्कम ऑनलाईन भरण्यासाठी

चलान क्रमांक अथवा कारवाईचा तपशील आणि दंडाची रक्कम तुम्हाला वरील स्टेप वापरून प्राप्त झाल्यानंतर तुम्ही पुढील स्टेप वापरून ऑनलाईन दंडाची रक्कम भरू शकता

  • तुम्हाला ज्या चालानसाठी पैसे भरायचे आहेत ते निवडा.
  • प्रोसीड टू पे (proceed to pay) वर क्लिक करा.
  • त्यानंतर नियम व अटी तुम्हाला वाचून क्लिक करायच्या आहेत. 
  • त्यानंतर तुम्ही पे नाऊ (Pay Now ) वर क्लिक करा
  • त्यानंतर तुम्हाला pay through bill desk वर क्लिक करायचे आहे.
  • पेमेंटची पद्धत निवडा - क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट-बँकिंग क्यू-आर कोड  इ.
  • पेमेंटसाठी विचारलेली आवश्यक माहिती भरा त्यानंतर, पेमेंट होईल.
  • त्यानंतर पेमेंट भरल्यानंतर तुम्हाला चलन भरल्याची पावती मिळेल.