Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कियारा अडवाणी व सिध्दार्थ मल्होत्रा अडकणार विवाहबंधनात, जाणून घ्या या दोघांमध्ये सर्वाधिक श्रीमंत कोण?

Kiara Advani and Sidharth Malhotra Wedding

Image Source : http://www.chrome-extension.com/

Kiara Advani and Sidharth Malhotra Wedding Date: सध्या बाॅलिवुडमध्ये लग्नाची धुम सुरू आहे. एकापाठो पाठ एक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत आहे. आता अथिया शेट्टी व केएल राहुल यांच्या लग्नानंतर अभिनेत्री कियारा अडवाणी व अभिनेता सिध्दार्थ मल्होत्रा लग्न करणार आहेत. हे दोघे ही आपली लक्झरी लाइफ जगतात मात्र या दोघांमध्ये अधिक श्रीमंत कोण आहे जाणून घ्या.

Kiara Advani & Sidharth Malhotra Wedding: बाॅलिवुडची सुंदर जोडी कियारा अडवाणी (Kiara Advani) व सिध्दार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) हे दोघे 6 फ्रेबुवारीला लग्नबंधनात अडकणार आहे. तसेच 4 व 5 फ्रेबुवारीपासून या शाही लग्नाचे कार्यक्रम सुरू होणार आहेत. हे लग्न 100 ते 150 पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. बाॅलिवुडमधील या महागडया लग्नाची चर्चा सर्वत्र आहे. पण तुम्हाला माहिती का या दोघांमध्ये सर्वाधिक श्रीमंत कोण आहे?

कधी व कुठे आहे लग्न? (When and where is the Wedding)

कियारा अडवाणी व सिध्दार्थ मल्होत्रा ही जोडी 6 फ्रेबुवारीला लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. राजस्थानच्या (Rajasthan) जैसलमर (Jaisalmer) येथील सूर्यगड पॅलेस (Suryagad Palace) येथे या दोघांचा शाही विवाह संपन्न होणार आहे. हे दोन्ही कलाकार आपली लग्झरी लाइफ जगतात. सांगितले जात आहे की, या पॅलेसमध्ये त्यांनी पाहुण्यांसाठी काही रूम्स बुक केल्या आहेत, त्या रूम्सचे भाडे प्रति दिन 1 ते 2 दोन कोटी आहेत.

सर्वाधिक संपत्ती कोणाकडे? (Who has the most Wealth)

 रिपोर्ट्सनुसार अभिनेता सिध्दार्थ मल्होत्रा हा कियारा अडवाणीपेक्षा सर्वात श्रीमंत असल्याचे सांगितले जात आहे. सिध्दार्थकडे एकूण संपत्ती 80 कोटी, तर कियारा अडवाणीकडे एकूण संपत्ती ही 23 कोटी असल्याचे सांगितले जात आहे.

एका चित्रपटासाठी कोण घेतो जास्त मानधन? (Who charges more for a Film) 

बाॅलिवुडमध्ये कियारा अडवाणीनेदेखील अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहे. कियाराला ‘कबीर (Kabir)’ या चित्रपटापासून अधिक प्रसिद्धी मिळाली आहे. ही अभिनेत्री एक चित्रपटासाठी 4 ते 5 कोटी रूपये मानधन घेते. तर अभिनेता सिध्दार्थ मल्होत्रा याला ‘स्टुडंट आॅफ द इयर (Student of the Year)' या चित्रपटापासून प्रसिध्दी मिळाली. त्याचा हा पहिलाच चित्रपट सुपरहीट ठरला होता. त्याने 'थॅक गाॅड (Thank God) या चित्रपटासाठी 7 ते 8 कोटी रूपये आकारले होते.

सिध्दार्थ मल्होत्राची लक्झरी लाइफ (Siddharth Malhotra's Luxury Life)

सिध्दार्थ मल्होत्रा यांच्याकडे एकापेक्षा एक महागाडया गाडयांची लाइन लागली आहे. तसेच मुंबईतील (Mumbai) वांद्रे (Vandre) या भागात त्याचे एक आलिशान घर आहे. त्या या सुंदर घरातून समुद्राचेदेखील दर्शन होते. या भव्य घराची रचना शाहरूख खान (Shahrukh Khan)ची पत्नी गौरी खान (Gauri Khan) हिने केली आहे. या मोठया घरात सर्व लक्झरी सुविधादेखील उपलब्ध आहेत.

कियारा अडवाणीच्या लक्झरी कारचे कलेक्शन (Kiara Advani's Luxury Car Collection)

कियारा अडवाणीजवळदेखील महागडया कार्स आहेत. तिच्या या यादीमध्ये मर्सिडीज बेंझ इ 220 डी (Mercedes Benz E.220 D) ही गाडी आहे. तिच्या या गाडीची किंमत 60 लाख रूपये आहे. Audi A 89, L Sedan या राॅयल्स गाड्यादेखील आहेत. या गाडयांची किंमत साधारण 1.56 कोटी रूपये आहे.