Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सिध्दार्थ मल्होत्रा- कियारा अडवाणी यांचे लग्न, पॅलेसच्या 80 रूम्स बुक तर प्रत्येक रूमचे प्रति दिन भाडे एक ते दोन कोटी

Sidharth Malhotra & Kiara Advani Wedding

Image Source : http://www.dailyo.in/

Sidharth Malhotra & Kiara Advani Wedding: बाॅलिवुडमध्ये कलाकारांच्या लग्नांची रांगच लागली आहे. एकामागे एक सेलेब्रिटी लग्नाची गाठ बांधत आहे. आता आथिया शेट्टी व केएल राहुल यांच्या लग्नानंतर बाॅलिवुडची आणखी एक सुंदर जोडी लग्न बंधनात अडकणार आहे, ती म्हणजे सिध्दार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी.

Sidharth Malhotra & Kiara Advani: बाॅलिवुडची जबरदस्त जोडी सिध्दार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी हे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्यांनी त्यांच्या लग्नासाठी राजस्थानमधील एक आलिशान पॅलेस बुक केले आहे. त्यांच्या या पॅलेसमध्ये त्यांनी काही पाहुण्यांसाठी रूम्स बुक केल्या आहेत, त्या रूम्सचे एका दिवासाचे भाडेच एक ते दोन कोटी आहे.

सिध्दार्थ मल्होत्रा व कियारा आडवाणीचे लग्न कधी?(When will Siddharth Malhotra and Kiara Advani Get Married)

बाॅलिवुडची आकर्षित जोडी सिध्दार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी यांचे 6 फ्रेबुवारीला लग्न आहे. त्यांचा हा शाही लग्नसोहळा राजस्थानमधील एक अलिशान पॅलेसमध्ये होणार आहे. त्यांच्या या शाही लग्न सोहळयाला फक्त 100 ते 125 पाहुणे उपस्थित असणार आहे.

कोणत्या पॅलेसमध्ये होणार लग्न (Where to Get Married)

सिध्दार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी या शानदार जोडीचे लग्न राजस्थानमधील ‘सूर्यगड पॅलेस’ (Suryagad Palace) येथे पार पडणार आहे. या अलिशान पॅलेसमध्ये त्यांनी पाहुण्यासाठी 80 रूम्स बुक केल्या आहेत. या रूम्सचे प्रत्येक दिवसाचे भाडे हे 1 ते 2 कोटीच्या जवळपास असल्याचे सांगितले जात आहे. लग्नाच्या सर्व कार्यक्रम याच पॅलेसमध्ये होणार आहेत. तसेच बाॅलिवुडचे हे ग्रॅंड लग्न एकदम कडेकोट सुरक्षितेत होणार आहे. तसेच पाहुण्यांच्या मर्सिडीज बेंझ, जग्वार आणि बीएमडब्ल्यूसारख्या 70 लक्झरी कार्स पार्किंग करण्याचीदेखील उत्तम सोय करण्यात आली आहे.

बाॅलिवुडचे कोणते कलाकार लावणार हजेरी (Which Bollywood Actors are Present)

सिध्दार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीच्या लग्नाला बाॅलिवुडचे मोठ-मोठे कलाकार हजेरी लावणार आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन, करण जोहर, शाहरुख खान, वरुण धवन, ईशा अंबानी, शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचा समावेश आहे. तर कियारा-सिद्धार्थ यांच्या बालपणीच्या मित्रांनादेखील या शाही लग्नाचे आंमत्रण देण्यात आले आहे.

मुंबईत होणार ग्रँड वेडिंग रिसेप्शन (Grand Wedding Reception to be Held in Mumbai)

सिध्दार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी यांच्या लग्नाचे कार्यक्रम 4 आणि 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. लग्नाच्या दिवशी त्यांचा हळदी आणि संगीत सोहळा धुमधडाक्यात होणार आहे. या राॅयल लग्नानंतर ही जोडी मुंबई येथे ग्रँड वेडिंग रिसेप्शनचे आयोजन करणार आहे.